Tuesday, 11 May 2021

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्याचे दिले संकेत !!

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्याचे दिले संकेत !!


मुंबई : राज्यात रुग्णसंख्या नियंत्रणात येताना दिसत असली तरी अद्यापही लस आणि अन्य आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे लॉकडाउन 31 मेपर्यंत वाढवण्याचे संकेत देण्यात आले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तसे संकेत दिले असून, ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

उद्या मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्‍यता असली तरी त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, या बैठकीतच पुढील रूपरेषा ठरवली जाणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच कॅबिनेटच्या सदस्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. लॉकडाऊन किंवा ब्रेक दी चेनअंतर्गत जे निर्बंध लागू करण्यात आले आहेत ते वाढवायचे की, कमी करायचे या सर्व गोष्टींसंदर्भातील निर्णय घेतले जाऊ शकतात, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, यावेळी त्यांनी लगेच पूर्ण लॉकडाऊन हटवला जाईल अशी अपेक्षा करू नका, असेही म्हटले आहे. सगळं लगेच शंभर टक्के कमी होणार नाही. निर्बंध हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न होऊ शकेल असा आपला अंदाज आहे. पण पूर्ण लॉकडाऊन काढून शंभर टक्के मोकळीक होईल असे होणार नाही. चर्चा होईल आणि मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले.

1 comment:

  1. 31 मे पर्यंत लॉक डाउन न वाढवता दुपारी 1 नंतर सर्व दुकाने उघडी ठेवण्यात व्यापारी वर्गाला दिलासा मिळेल. परीस्थिती कोरोणा शिथिल होत असली तरी लोकांचे पोटापाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.

    ReplyDelete

डॉ.भारती बावदाने व विधानसभाप्रमुख डॉ.सुबोध बावदाने यांच्या वतीने प्रभाग क्रमांक १२३ मध्ये शिवसेना शिवकार्य सदस्य नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

डॉ.भारती बावदाने व विधानसभाप्रमुख डॉ.सुबोध बावदाने यांच्या वतीने प्रभाग क्रमांक १२३ मध्ये शिवसेना शिवकार्य सदस्य नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त...