Tuesday, 11 May 2021

राज्यात आजही नवीन कोरोनाबाधीत रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त !

राज्यात आजही नवीन कोरोनाबाधीत रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त !


मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासून 60 हजारांच्या पुढे आढळणारी कोरोना रुग्णसंख्या 40 हजारांच्या जवळपास आली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 40 हजार 956 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर 71 हजार 966 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत 793 कोरोना रुग्णांना मृत्यू झालाय. आतापर्यंत कोरोना विषाणूने 77 हजार 191 रुग्णांचा जीव घेतला आहे. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे

महाराष्ट्रात कोरोनाचे 5 लाख 58 हजार 996 सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत राज्यात 51 लाख 79 हजार 929 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 45 लाख 41 हजार 391 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचा कोरोना आलेख घसरताना दिसत आहे. राज्यात लॉकडाईन केल्याचे हे चांगले परिणाम असल्याचं बोललं जातंय.

No comments:

Post a Comment

ओल्या कचऱ्यापासून निर्मित कचऱ्याची सवलतीच्या दरात विक्री !

वाडा नगरपंचायतीचा अभिनव उपक्रम !! ** ओल्या कचऱ्यापासून निर्मित कचऱ्याची सवलतीच्या दरात विक्री  वाडा नगरपंचायत तर्फे ओल्या कचऱ्या...