Tuesday, 11 May 2021

शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखाताई पाटील यांची कोविड पार्श्वभूमीवर माणगांव तालुक्याला भरीव मदत !

शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखाताई पाटील यांची कोविड पार्श्वभूमीवर माणगांव तालुक्याला भरीव मदत !


        बोरघर / माणगांव, (विश्वास गायकवाड) : शेतकरी कामगार पक्षातर्फे कोविड पार्श्वभूमीवर माणगांव तालुक्यातील कोविड रुग्णांकारिता २५  बेड व १० ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर इत्यादी साहित्य आज शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखाताई पाटील यांच्या तर्फे RDC Bank संचालक अस्लमभाई राऊत व शेतकरी कामगार पक्ष युवा नेते निलेश थोरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
      माणगांव तालुक्यातील जनतेसाठी सर्वप्रथम शेतकरी कामगार पक्षाने सदर मदतीचे पाऊल उचलल्यामुळे शेतकरी कामगार पक्षाची जनतेशी असलेली नाळ कायम असल्याचे सर्व जनतेतून बोलले जात आहे.  
      त्याचप्रमाणे तालुक्यातील इतर राजकीय पक्षाचे पुढारी वैयक्तिक स्वार्थासाठी लढाया करत असताना शेतकरी कामगार पक्ष मात्र जनतेसाठी लढताना दिसत आहे. येत्या काही दिवसातच शेकाप तर्फे कोकण हॉस्पिटल मोर्बा येथे कोविड केअर सेंटर चालू करण्यात येणार असून सर्वसामान्य जनतेला त्याचा मोठा फायदा होणार आहे. या पुर्वी शेतकरी कामगार पक्षा तर्फे गरीब गरजू लोकांना मोफत जेवण तसेच कोविड रुग्णांना सर्वप्रकारची मदत केली जात आहे. शेतकरी कामगार पक्ष लोकप्रिय  युवा नेते निलेश थोरे यांनी हे साहित्य मिळावे यासाठी विशेष मागणी व पाठपुरावा केला होता.
      दरम्यान शेकाप वगळता इतर कोणताही राजकीय पक्ष अद्याप कोविड संदर्भात कोणतीही मदत माणगांव तालुक्यात करताना दिसत नसताना लाखो रुपयांचे अत्यावश्यक साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंतभाई पाटील व विशेषतः महिला आघाडी प्रमुख चित्रलेखाताई पाटील यांचे माणगाव तालुक्यातील जनतेकडून सर्वत्र कौतुक होत असून मोर्बा व सदर पंचक्रोशीतील जनतेनी या बाबत विशेष आभार व्यक्त केले आहेत.

No comments:

Post a Comment

वी नीड यू सोसायटीचे २०२४चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर !!

वी नीड यू सोसायटीचे २०२४चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर !! ठाणे, प्रतिनिधी : वी नीड यू सोसायटी संस्थेतर्फे समाजात ‘व...