Tuesday, 11 May 2021

कल्याण तालुक्यात लाॅकडाऊण यशस्वी होईल का? कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच!

कल्याण तालुक्यात लाॅकडाऊण यशस्वी होईल का? कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच!


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन ही साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चैन अतर्गत कल्याण तहसीलदार दिपक आकडे यांनी तालुक्यात पाच दिवसांचा कडक लाॅकडाऊण जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मंजुरीने लागू केला. परंतु शेजारच्या बिर्लागेट व केडिएमसी परिसर काही काळ लाॅकडाऊण मुक्त असल्याने तालुक्यात याचा फारसा परिणाम झाला असे वाढत्या रुग्ण संख्येवरून वाटत नाही. त्यामुळे उरलेल्या तीन दिवसात तरी याचे काटेकोर पालन करावे लागेल.
कल्याण तालुक्याचा विचार केला तर तालुक्यात शुक्रवारी म्हणजे ७/५/२०२१ रोजी एकुण ३५ कोरोना चे पेंशट होते. यामध्ये खोणी पलावा ११, म्हारळ ५, वरप ३, घोटसई १, कांबा २, रायते, अनखरपाडा, रेवती, रोहन, बापसई, वाहोली, दानबाव, राया, कोंढेरी प्रत्येकी १, उतणे ३, शनिवारी १४, यात पलावा ६, म्हारळ ४, वरप, रायते, प्रत्येकी १, गोवेली २,आणि रविवारी म्हणजे ९/५/२०२१ रोजी पलावा ४, म्हारळ २, गुरवली, नडगाव, फळेगाव प्रत्येकी १, त्यामुळे या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन कल्याण तहसीलदार दिपक आकडे यांनी तालुक्यातील ग्रामीण भागात सोमवार दि १०/५/२०२१ ते शुक्रवार दि १४/५/२०२१ असा ५ दिवसांचा कडक लाॅकडाऊण लागू करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना सादर केला. त्यांनी याला तात्काळ मंजुरी दिली. आणि तालुक्यात सोमवार पासून लाॅकडाऊण लागू झाले. शासकीय आदेशाचे पालन करावे म्हणून दुकाने व इतर आस्थापना बंद ठेवण्यात आले. ग्रामीण भागातील व्यवहार बंद केले. पण शेजारच्या बिर्लागेट येथील बाजारपेठेत सकाळी ७ ते अकरा या वेळेत या परिसरातील नागरिकांनी खरेदीसाठी तूफान गर्दी केली. विशेष म्हणजे रोजच अशी जत्रा भरल्याचे दिसून येत असल्याने येथून कोरोनाची देवान घेवान होणार नाही कशावरून? शिवाय दिवसभर रिकामटेकड्याची ये जा सुरूच असते. त्यामुळे कल्याण ग्रामीण भागात लाॅकडाऊण चा परिणाम होईल का? अशीच परिस्थिती सध्या तरी दिसत आहे. कारण आज म्हणजे मंगळवारी कोरोना ची संख्या २० आहे, यामध्ये पलावा ५, म्हारळ ९, वरप १, म्हसकळ १, जांभूळ १, नडगाव १, गुरवली १, दहिसर १, अशी स्थिती आहे. तालुक्यात १८१९, इतके अॅक्टिव पेंशट आहेत. आतापर्यंत १८३ लोकांचा जीव गेला असून १८ प्रतिबंधक क्षेत्र आहे. त्यामुळे रिकामटेकड्यासह इतरांना आळा घालायचा असेल तर पोलीस अ‍ॅक्शन मोड मध्ये यायला हवे, अन्यथा उरलेले तीन दिवस लाॅकडाऊण चा काही फरक पडेल असे वाटत नाही. 

No comments:

Post a Comment

निळजे गाव येथे आई एकवीरा देवी पदयात्रा पालखी सोहळा मोठया भक्तिमय वातावरणात संपन्न ! ** ह. भ. प. श्री जितेन्द्र महाराज पाटील यांच्या कीर्तनान...