उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून घडली मोठी दुर्घटना !
उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये एका इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब थेट तळमजल्यापर्यंत कोसळत आल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आत्तापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत. दरम्यान या दुर्घटनेमुळे उल्हासनगरमधील धोकादायक, अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प 1 भागातील मोहिनी पॅलेस इमारतीत आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या इमारतीत 9 फ्लॅट आणि 8 दुकानं होती. इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळून थेट तळमजल्यावर आला. अक्षरशः पट्ट्यासारखा चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळला, तो थेट जमिनीवर आला. या घटनेनंतर अग्निशमन दलासह ठाणे महापालिकेच्या टीडीआरएफ आणि एनडीआरएफने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं.
No comments:
Post a Comment