Thursday, 13 May 2021

भाजपाच्या मदतीने कल्याण पंचायत समितीच्या उपसभापती पदी किरन ठोंबरे विजयी !

भाजपाच्या मदतीने कल्याण पंचायत समितीच्या उपसभापती पदी किरन ठोंबरे विजयी !              


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण पंचायत समितीच्या उपसभापती पदी भाजपाच्या मदतीने किरन ठोंबरे हे विजयी झाले असून त्यांनी सेनेचे भरत भोईर यांचा केवळ एका मताने पराभव केला, यावेळी राष्ट्रवादी काग्रेस पक्षाच्या सदस्या दर्शना जाधव या गैरहजर राहिल्याने हा विजय मिळवता आला, तर आपण सेनेचेच उपसभापती असल्याचा दावा यावेळी ठोंबरे यांनी केला. 


कल्याण पंचायत समितीवर तसे पाहिलेतर शिवसेनेची सत्ता आहे, परंतू यामध्ये कायम किंगमेकर ठरली ती भाजपा, कल्याण पंचायत समितीमध्ये भाजपाचे ५, यामध्ये रंजना देशमुख, अस्मिता जाधव, पांडूरंग म्हात्रे, यशवंत दळवी आणि रेश्मा भोईर, शिवसेनेचे ४ यामध्ये अनिता वाक्चौरे, रमेश बांगर, किरण ठोंबरे, भरत भोईर तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ सदस्य असून ते भरत गोधळे, दर्शना जाधव व भारती टेंभे यांचा समावेश आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष असतानाही त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश आले होते. परंतू मागील निवडणूकित शिवसेनेत बेबनाव झाला होता, यावेळी शिवसेनेच्या अनिता वाकचौरे या सभापती तर सेनेचेच रमेश बांगर हे उपसभापती निवडूण आले होते, यावेळी वाद झाला होता, त्यामुळे मागील दोन ते तीन आठवड्यापूर्वी उपसभापती रमेश बांगर यांच्या विरोधात शिवसेनेचे किरण ठोंबरे यांनी अविश्वास ठराव आणला होता व तो मंजूर देखील झाला होता, या पत्रावर एकूण १२. सदस्यापैकी १० सद्स्यांच्या सह्या होत्या, त्यामुळे उपसभापती पदाची निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत असतानाच आज अचानक निवडणुकीच्या वेळी खोणी गटातील शिवसेनेचे सदस्य भरत भोईर यांनी उपसभापती पदाचे प्रबळ दावेदार उमेवार किरन ठोंबरे यांच्या विरोधात उपसभापती पदासाठी उमेवारी अर्ज भरला आणि बिनविरोध चे चित्र पालटले, कारण शिवसेनेच्या व राष्ट्रवादीची गटाने भरत भोईर यांना गळाला लावले होते, पण आमदार किसन कथोरे यांनी अशी काही खेळी खेळली की नेमक्या आजच्या दिवशी राष्ट्रवादीच्या सदस्या दर्शना जाधव या गैरहजर राहिल्या, वास्तविक पाहता कल्याण पंचायत समितीवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीची सत्ता आहे, पण येथील राजकारणाचा काही अंदाज बांधता येत नाही, त्यामुळे आज झालेल्या उपसभापती पदाच्या निवडणूकीत भाजपाने शिवसेनेचे किरन ठोंबरे यांना पाठिंबा दिला, त्यामुळे ठोंबरे यांना ६ तर सेनेचेच भरत भोईर यांना ५ मते मिळाली, त्यामुळे ठोंबरे यांचा एका मतांनी विजय झाला, त्यांनी सर्वांचे आभार माणून आपण शिवसेनेचाच उपसभापती असल्याचा दावा केला आहे, तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे, आणि आमदार किसन कथोरे यांच्या आशिर्वादामुळेच आपण उपसभापती झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सभापती अनिता वाकचौरे, गटविकास अधिकारी श्वेता पालवे आणि निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार दिपक आकडे यांनी उपसभापती ठोंबरे यांचे पुष्षगुच्छ देऊन स्वागत केले.

No comments:

Post a Comment

स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून आधारकार्ड नोंदणी शिबीर संपन्न !

स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून आधारकार्ड नोंदणी शिबीर संपन्न ! **शिबिरात आधारकार्ड नोंदणी व अद्यायावत करण्यासाठी नागरीकांची गर्दी **तसेच ब प्र...