Monday, 10 May 2021

राज्यात दिवसभरात रुग्णसंख्येत मोठी घट !

राज्यात दिवसभरात रुग्णसंख्येत मोठी घट !


मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून ५० हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून येणाऱ्या महाराष्ट्राला आज दिलासादायक बातमी मिळाली आहे. अनेक दिवसांनंतर राज्यातील कोरोना आकडेवारी ४० हजारांच्या खाली आली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ३७ हजार ३२६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर ६१ हजार ६०७ रुग्णांनी विषाणूवर मात केली असून त्यांना डिस्जार्ज देण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. महाराष्ट्रात कालपर्यंत 1 कोटी 80 लाख 88 हजार 042 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. 9 मे 2021 रोजी 3718 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून 110448 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.

राज्यात गेल्या २४ तासांत ५४९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 5 लाख 90 हजार 818 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात 51 लाख 38 हजार 973 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 44 लाख 69 हजार 425 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत राज्यात 76 हजार 398 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

No comments:

Post a Comment

निळजे गाव येथे आई एकवीरा देवी पदयात्रा पालखी सोहळा मोठया भक्तिमय वातावरणात संपन्न ! ** ह. भ. प. श्री जितेन्द्र महाराज पाटील यांच्या कीर्तनान...