अठरा ते चव्वेचाळीस वर्षातील कोरोना कोविड लसीकरण बंद, स्थानिकांना प्राधान्यक्रमासाठी विरोध ?
कल्याण, (संजय कांबळे) : कोरोनाच्या महामारीवर उपाय म्हणजे लसीकरण हे सर्वानाच पटल्यानंतर आता प्रथम स्थानिक नागरीकांना प्राधान्य द्या अन्यथा लसीकरण होऊ देणार नाही अशी भूमिका काही लोकप्रतिनिधी व नागरिकांनी घेतल्याने कल्याण तालुक्यातील गोवेली ग्रामीण रुग्णालयातील १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद ठेवण्यात आले असून यामुळे स्थानिकासह बाहेरील लाभार्थी वंचित राहणार आहे.
देशात कोरोनाच्या दुसर्या लाटेने हाहाकार उडवला आहे. यामध्ये शेकडो लोकांचा बळी गेला आहे. रेमडेसिवर औषध, व्हन्टिलेटर आणि आॅक्शिजन आदी वेळेवर मिळत नसल्याने अनेक पेंशट मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे हे सर्व रोखायचे असेल कोरोना कोविड लसीकरण अत्यावश्यक असल्याचे सर्व तज्ज्ञांचे मत आहे. त्यानुसार राज्य शासनाने ४५वर्षावरील लोकांना, तसेच फ्रन्ट लाईन वर्करना लसीकरण करण्यात आले. शासनाने आतापर्यंत २८ लाख ६६हजार नागरिकांना लसीकरण केले आहे तर १कोटी ६७ लाख ८१ हजार लोकांना लसीकरणाचा दुसरा डोस दिला आहे.
यानंतर मात्र १८ ते ४४ वयोगटातील मुलांना व नागरिकांना कोरोना कोविड लसीकरण देण्याचा निर्णय घेतला. परंतु याबाबत कोविड अॅप हा केंद्र सरकारने तयार केला. व या अॅपवर आॅनलाईन नोंदणी करणाऱ्यांनाच लस देण्यात येईल असे जाहीर केले. त्यामुळे कोणी कुठेही नोंदणी करु लागल्याने काही मिनिटातच हे अॅप फुल्ल होते.
ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर ठाणे सिव्हिल हाॅस्पिटल, सेंट्रल हाॅस्पिटल, अॅडनस फॅक्टरी अंबरनाथ, आय जी एम भिवंडी, शहापूर एच डिएस, बदलापूर ग्रामीण रुग्णालय, गोवेली ग्रामीण रुग्णालय, मुरबाड, धसई, टोकावडे, आणि शेद्रूण प्राथमिक आरोग्य केंद्र, अशा केंद्रावर १८ ते ४ ४ वयोगटातील मुलांना व नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे. परंतु ही नोंदणी आॅनलाईन असल्याने शहरी भागातील लोक मोठय़ा संख्येने नोंदणी करीत आहेत गोवेली, मुरबाड, धसई, टोकावडे या केंद्रावर तर मुंबई, ठाणे, पनवेल, खारघर येथील लोक दिसू लागल्याने आमच्या वर अन्याय झाल्याची भावना येथील स्थानिक लोकांमध्ये निर्माण झाली आहे ग्रामीण भागातील नागरिक कामधंदे करून कोविड अॅप उघडतात तोच काही मिनिटांत तो फुल्ल होतो. तर दुसरीकडे शहरी लोक यावरच बसलेले असतात. त्यांचा पटकन नंबर लागतो. अशातच ग्रामीण भागात कधी लाईट नसते, नेटवर्क नसते त्यामुळे यांना त्यावेळेत अॅपवर नोंदणी करता येत नाही.याचाच परिणाम हे लोक लसीकरणापासून वंचित राहतात.
दोनच दिवसांपूर्वी कल्याण तालुक्यातील गोवेली ग्रामीण रुग्णालयात १८ /४४ वयोगटातील लोकांचे लसीकरण केंद्र सुरू झाले होते. पण या केंद्रावर तालुक्यातील नागरिकांपेक्षा पनवेल, खारघर, वाशी, मुंबई आदी शहरातील लोक जास्त दिसू लागल्याने ग्रामीण भागात संतापाची लाट उसळली जिल्हा परिषद सदस्या श्रीमती जयश्री सासे, रेश्मा मगर, गोवेली ग्रामपंचायतीच्या सरपंच पूजा दिपक जाधव, आदींनी लसीकरण केंद्रास भेट देऊन लसीकरण बंद करण्याची मागणी केली. प्रथम स्थानिक लोकांना प्राधान्य द्यावे लागेल अशी भूमिका घेतली. यानंतर अनेकांनी पत्रे देऊन लसीकरण केंद्र बंद पाडण्याचे, अंदोलन, उपोषण करण्याचा इशारा दिला. हा प्रकार गोवेली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ योगेश कापूसकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे, अतिरिक्त सीईओ श्रीमती रुपाली सातपुते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मनिष रेगे, सिव्हिल हाॅस्पिटल चे प्रमुख डाॅ पवार यांच्या बैठकीत सांगितला. त्यामुळे पुढील निर्णय घेई पर्यंत लसीकरण बंद ठेवण्यास सांगितले आहे.
आतापर्यंत या केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील २५३ लोकांना लसीकरण झाले आहे. यामध्ये काही प्रमाणात कल्याण तालुक्यातील नागरिकांचे पण लसीकरण झाले असेलच. पण आता बंद तेही बंद झाल्याने मोठी अडचण येणार आहे. तर शहरी भागातील लोक या ना त्या केंद्रावर लस घेतील. पण आपल्या बंद झालेल्या केंद्राचे काय? दुस-या केंद्रावर आपल्याला प्राधान्य कितपत मिळेल याचाही सर्वांनी विचार करायला हवा. अधीच लसीचा तूटवडा त्यात केंद्र बंद? त्यामुळे कल्याण तालुक्यातील १८/४४ लसीकरण मोहिमेचे काय होणार? यावर केंद्र सरकारने तात्काळ तोडगा काढावा. यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करायला हवा.
No comments:
Post a Comment