कल्याण तालुक्यात कडक लाॅकडाऊण, सर्व आस्थापना बंद, मात्र रिकामटेकडे रस्त्यावर ?
कल्याण, (संजय कांबळे) : ब्रेक द चैन मोहिमेंतर्गत कोरोना ची साखळी तोडण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कल्याण तालुक्यात सोमवार ते शुक्रवार असा ५दिवसांचा कडक लाॅकडाऊण लागू केला. याला सर्व दुकानदार व इतर आस्थापना यांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला खरा पण काही रिकामटेकडे यांनी लाॅकडाऊण चे पालन केले नाही असे चित्र या परिसरात दिसत होते.
कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना ने हातपाय पसरले आहेत.
गावोगावी कोरोनाचे पेंशट वाढत आहेत. त्यामुळे शासनाने प्राधान्याने लागू केलेल्या 'ब्रेक द चैन' अतर्गत कल्याण तहसीलदार दिपक आकडे यांनी तालुक्यात सोमवार दि २०/५/ २०२१ते शुक्रवार दि १४/५/२०२१ असा ५ दिवसांचा कडक लाॅकडाऊण लागू करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना सादर केला होता. कोरोना ची वाढती रुग्ण लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ याला मंजुरी दिली व तसे आदेश काढले.
यामध्ये तालुक्यातील किराणा दुकान, भाजीपाला, बेकरी, मटन, चिकण, मासे, आदी सर्व आस्थापना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. केवळ घरपोच दुध सेवा सुरू केली असे आदेशात म्हटले आहे. यानुसार ग्रामपंचायत म्हारळ वरप कांबा आदी नी प्रत्येक दुकानदार यांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. दुकानदार आणि इतर आस्थापना यांनी लाॅकडाऊण ला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. पण रस्त्यावर कुठेही पोलीस नसल्याने म्हारळ, वरप, कांबा, पाचामैल, पांजरपोळ, उलहासनदी, सिमा रिसाॅट, गोवेली, रायते आदी ठिकाणी काही रिकामटेकडे बिनकामाचे फिरताना दिसत होते. त्यामुळे अशा महाभागांना काय म्हणावे? त्यामुळे अशांवर कारवाई व्हायला हवी.
गावातील ग्रामपंचायत आणि पोलिसांनी यावर कडक कारवाही केली पाहिजे परंतु पोलिसाचे अपुरे बल आणि मनुष्य बळ नाही आणि ग्रामपंचायत मधील कामगाराचे सर्व नातलग आहे म्हणून काही कारवाही नाही
ReplyDelete