श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) प्रस्तुत व शिवप्रेमी महालक्ष्मी गावडेवाडी मंडळ ( कळंबट ) आयोजित नमन प्रयोगाचे आयोजन !
कोकण सुपुत्र लाडका गायक सिद्धेश मेस्त्री मधुर गायनाने जिंकणार प्रेक्षकांची मने
मुंबई (शांताराम गुडेकर /दिपक कारकर)
लोककला आणि लोककलावंत यांचं माहेरघर असणाऱ्या कोकणातील बहूप्रिय "नमन" कलेचे आयोजन शिवप्रेमी महालक्ष्मी गावडेवाडी, कळंबट ( ता. चिपळूण, जि. रत्नागिरी ) ग्रामस्थ व महिला मंडळ आणि डिके ग्रुप आयोजित श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) प्रस्तुत श्री केदारलिंग नाट्य नमन मंडळ ( काटवली ) देवरुख निर्मित "नमन" बुधवार दि. १५ जानेवारी २०२५ रोजी रात्रौ ०८.३० वा.मा.दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले ( पूर्व ) येथे सादर होणार आहे.
कोकणातील भजन, नमन कलेची अवीट गोडी असणारा कलावंत, स्वतः हार्मोनियम ( कीबोर्ड ) वाजवून रसिकांच्या मनावर राज्य करणारे मधुर आवाजाचं लाडकं व्यक्तिमत्व, ज्यांची अनेक गाणी सुपर-डुपर हिट झाली,असे तरुण गायक सिद्धेश मेस्त्री मुंबई रंगभूमीवर येत आहेत. आजवर नाद घुमला, कसा देव माझा नाचतोय रे ( शिमगा गीत ), कधी तू येशील गणा अशी त्यांची गाणी लोकप्रिय ठरली आहेत. भजन डबलबारी, सिंगलबारी ते गायन कलेच्या अनेक कार्यक्रमात सिद्धेश उत्तमरित्या गायन करताना दिसतात. मुंबईच्या भव्य रंगमंचावर प्रथमच समस्त मुंबईकरांना मंत्रमुग्ध करण्यास गायक सिद्धेश मेस्त्री येत असल्याने कार्यक्रमाला प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल प्रतिसाद दिला आहे .गावचे नमन कार्यक्रम जेव्हा मुंबईच्या रंगमंचावर सादर होतात तेव्हा कोकणकर वासिय मुंबईकर बांधवांना यांना एक नवी पर्वणीची उत्सुकता लागून राहत असते. आयोजनात अव्वल असणाऱ्या श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) यांच्या विशेष सहकार्याने सादर होणाऱ्या ह्या सोहळ्याला मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी रमेश कोकमकर - ८८५०४२२७११ यांच्याशी संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment