Tuesday, 14 January 2025

शाळा कळंबट क्रमांक १ चा विध्यार्थी कु. शंतनू घाणेकर ठरला जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये उत्कृष्ठ गोलंदाजचा मानकरी !

शाळा कळंबट क्रमांक १ चा विध्यार्थी कु. शंतनू घाणेकर ठरला जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये उत्कृष्ठ गोलंदाजचा मानकरी !

प्रतिनिधी  - निलेश कोकमकर 
      शालेय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये बहुगुण उतरवण्याचे खरे काम हे शिक्षक करत असतात आणि त्यांना वाव मिळण्यासाठी गट, तालुका आणि जिल्हा स्तरीय स्पर्धेचे आयोजन केले जाते. अश्याच एका जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत चिपळूण तालुका संघाकडून खेळताना  शाळा कळंबट क्रमांक १ चा विध्यार्थी कु. शंतनू घाणेकर याने गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करत उत्कृष्ठ गोलंदाजचा बहुमान मिळवला आहे. 
           सावर्डे येथे झालेल्या जिल्हा परिषद रत्नागिरी पुरस्कृत जिल्हा परिषद रत्नागिरी (शिक्षण विभाग) आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा या मध्ये क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील ९ तालुक्यातील संघांचा सहभाग होता. ह्या स्पर्धेत अंतिम सामना हा चिपळूण तालुका विरुद्ध संगमेश्वर तालुका असा झाला आणि त्या सामन्यात  चिपळूण तालुका या संघाने सामना जिंकून अंतिम विजेता पदाचा बहूमान पटकावला. चिपळूण तालुक्यातील संघामध्ये कोंडमळा गावचा सुपुत्र परंतु सध्या कळंबट कुडूकवाडी येथे वास्तवास असलेला तसेच जिल्हा परिषद शाळा कळंबट क्रमांक १ चा विद्यार्थी तसेच  कळंबट मधील सभासद दीपक गणू आगरी यांचा भाचा कुमार शंतनू सुनिल घाणेकर याची चिपळूण तालुका संघामध्ये निवड झाली होती. मिळालेल्या संधीचा चांगला फायदा घेत जिल्ह्याच्या अंतिम सामन्यामध्ये उत्तम कामगिरी कामगिरी बद्दल उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सन्मानित करण्यात आले.  

त्याबद्दल जिल्हा परिषद शाळा कळंबट क्रमांक १ चे शिक्षक, पदाधिकारी, ग्रामस्थ मंडळ कळंबट कुडूकवाडी व नवतरुण विकास मंडळ कळंबट कुडूकवाडी (मुंबई) तर्फे शंतनू व सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या .

No comments:

Post a Comment

श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) प्रस्तुत व शिवप्रेमी महालक्ष्मी गावडेवाडी मंडळ ( कळंबट ) आयोजित नमन प्रयोगाचे आयोजन !

श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) प्रस्तुत व शिवप्रेमी महालक्ष्मी गावडेवाडी मंडळ ( कळंबट ) आयोजित नमन प्रयोगाचे आयोजन ! कोकण सुपुत्र लाडका ...