Friday, 4 June 2021

कल्याण पंचायत समिती तर्फे पन्नास टक्के अनुदानावर भात बियाणे वाटप!

कल्याण पंचायत समिती तर्फे पन्नास टक्के अनुदानावर भात बियाणे वाटप!


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कल्याण पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या वतीने ५० टक्के अनुदानावर 'जया' आणि 'श्रीराम' या भात बियाणांचे वाटप सभापती श्रीमती अनिता वाकचौरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसभापती किरण ठोंबरे, माझी उपसभापती पांडुरंग म्हात्रे उपस्थित होते.


कोरोनाच्या भंयकर संकटात ज्या प्रमाणे इतर सर्व क्षेत्रे बाधित झाली आहेत तसे कृषी क्षेत्र देखील अडचणीत आले आहे. अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेले भात पीक कुजले. तर यातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड केली. उल्हासनगर, बिर्लागेट, कल्याण अशी हुकमी बाजारपेठ जवळपास असल्याने चांगला भाव मिळून चार पैसे मिळतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. पण यातच कोरोना आला, कडक लाॅकडाऊण मुळे भाजीपाला कवडीमोल दराने विकावा लागला. तर काहींचा शेतातच सडला त्यामुळे शेतकरी  पूरता नडला आहे.
आता या पावसाळ्यात तर भात पीक चांगले यावे ऐवढीच माफक अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. तालुक्यात ६ हजार ५९२ चौ हेक्टर क्षेत्रात भात पिक घेतले जाते. ३५० हेक्टर वर भाजीपाला लागवड केली जाते हे लक्षात घेऊन कल्याण पंचायत समितीच्या कृषी विभागाने जया ६८:२५ क्टिंटल तर श्रीराम ४० क्टिंटल भात बियाणे जे ५० टक्के अनुदानावर आहे. त्याचे वाटप नुकतेच कल्याण पंचायत समितीच्या सभापती श्रीमती अनिता वाकचौरे यांच्या हस्ते केले. यावेळी उपसभापती किरण ठोंबरे, माझी उपसभापती पांडुरंग म्हात्रे, लाभार्थी शेतकरी व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या भात बियाणांचा लाभ घ्यावा असे सभापती अनिता वाकचौरे यांनी अवाहन केले आहे. 

No comments:

Post a Comment

छत्रपती संभाजी महाराजांवरील अजिंक्य योद्धा हे दोन अंकी नाटकाचा बुधवार १२ रोजी शुभारंभ !

छत्रपती संभाजी महाराजांवरील अजिंक्य योद्धा हे दोन अंकी नाटकाचा बुधवार १२ रोजी शुभारंभ ! मुंबई, प्रतिनिधी‌ : आत्ताच्या सोशल मिडिय...