Friday, 7 February 2025

छत्रपती संभाजी महाराजांवरील अजिंक्य योद्धा हे दोन अंकी नाटकाचा बुधवार १२ रोजी शुभारंभ !

छत्रपती संभाजी महाराजांवरील अजिंक्य योद्धा हे दोन अंकी नाटकाचा बुधवार १२ रोजी शुभारंभ !

मुंबई, प्रतिनिधी‌ : आत्ताच्या सोशल मिडिया आणि युट्युबर्सच्या काळात कोकणातल्या मातीशीनाळ जोडत आपल्या मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास अटकेपार पोहचवण्यासाठी कोकणातील युट्युबर्स आणि अविअनिल कलामंच सादर करीत आहेत छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत करीत "अजिंक्य योद्धा" हे ऐतिहासिक २ अंकी नाटक जे छत्रपती संभाजी महाराजांच्या जिवनावर आधारित संभाजी महाराजांचा खराखुरा इतिहास सांगणारं नाटक "" अजिंक्य योध्दा "" लेखक / दिग्दर्शक =अविनाश गराटे. कलाकार =अनिल गराटे, गौरी झोटे, अक्षय परब, अनंत पातये, अजय ओर्पे, सुरज परब, सन्नी जाधव, सचिन पानगले, नलेश कदम, प्रशांत कातकर, मयुर खाडे आणि रविंद्र खैरे असे या नाटकातील कलाकार आहेत. कोकणी युट्युबर्स आणि पार्वतीपुत्र निर्मित अविअनिल कलामंच प्रस्तुत अजिंक्य योद्धा हे दोन अंकी नाटक बुधवार दि.१२ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्रौ ठिक ८ वाजता.छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर दादर येथे शुभारंभाचा प्रयोग सादर होणार आहे. तरी सर्व रसिकांनी शुभारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहुन आम्हा कलावंताना सहकार्य करावे अशी विनंती अजिंक्य योध्दा या नाटकाचे लेखक/ दिग्दर्शक अविनाश गराटे आणि आयोजक कोकणी युट्युबर्स यांनी केली आहे.तिकिटांसाठी व कार्यक्रमासाठी संपर्क ९५९४९४७९१२ / ९७०२१३७७८०*

No comments:

Post a Comment

छत्रपती संभाजी महाराजांवरील अजिंक्य योद्धा हे दोन अंकी नाटकाचा बुधवार १२ रोजी शुभारंभ !

छत्रपती संभाजी महाराजांवरील अजिंक्य योद्धा हे दोन अंकी नाटकाचा बुधवार १२ रोजी शुभारंभ ! मुंबई, प्रतिनिधी‌ : आत्ताच्या सोशल मिडिय...