Thursday, 6 February 2025

आई जीवदानी कला फाऊंडेशन महाराष्ट्र (रजि.) तर्फे नमन प्रेमींसाठी साहित्य संघ मंदिर येथे बहारदार कार्यक्रमाचे आयोजन !

आई जीवदानी कला फाऊंडेशन महाराष्ट्र (रजि.) तर्फे नमन प्रेमींसाठी साहित्य संघ मंदिर येथे बहारदार कार्यक्रमाचे आयोजन !

प्रतिनिधी - निलेश कोकमकर 
  
आई जीवदानी कला फाऊंडेशन महाराष्ट्र (रजि.) तर्फे नमन प्रेमींसाठी साहित्य संघ मंदिर येथे बहारदार कार्यक्रमाचे दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ८ वाजता साहित्य संघ गिरगाव मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे. 

शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली कोकण भूमी म्हणजे निसर्गाचा थाट, नमन कलेचे उगमस्थान. ह्याच कोकणातील नमन हौशी कलाकारांना सोबत घेऊन शाहिर श्री. भिकाजी भुवड यांनी आई जीवदानी कला फाऊंडेशनची स्थापना केली. कला फाउंडेशन १६ वर्ष झाली असून रजिस्टर करून ७ वर्ष झाली. ह्या कालावधीत नमनाचे जवळजवळ ८० ते ९० प्रयोग  करण्यात आले आहेत. 

गेली कित्येक वर्ष लेखक, शाहीर कवी भिकाजी तानु भुवड निर्मित आई जीवदानी कला फाऊंडेशन हे मंडळ कोकणचे लोकनाट्य - नमन सादर करून पुराणातील नवनवीन कथा सादर करून सामाजिक विषयावर प्रभोधन करून आपली  संस्कृती जपत आहेत, त्याचप्रमाणे गुहागर मतदार संघातील विद्यमान आमदार भास्करसेठ जाधव यांनी  नमन कलेला प्रोत्साहन देण्यासाठी सुवर्ण भास्कर नमन स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत या मंडळाने सहभाग घेतला आहे

ह्या मंडळाचे खास आकर्षण गणा पासूनच रसिकांना भुरळ पडणारे असते, गण गौळणीमध्ये राधा कृष्णा च्या अपरिचित कथा त्यातून सामाजिक संदेश देणे हा ह्या मंडळाचा हातखंडा आहे, तसेच लेखक श्री भिकाजी तानु भुवड यांचे वगनाट्य  नेहमी समाजात घडणाऱ्या घटनांवर आधारित असते
या वेळी सुद्धा *अखेर तिचा शेवट* हे वगनाट्य. 

"अखेर तिचा शेवट" हे वग नाट्य सध्या आपल्याच बाजूला घडत असलेल्या सत्य घटनेवर अधोरेखित केलेले आहे.  वासनेच्या आहारी जाऊन आघोरी कृत्य करणारी तरुण असो अथवा वयस्कर असो स्त्री म्हणजे त्यांच्या साठी भोगायची वस्तूच समजली जाते. अशाच एका मुलीने आपल्या आजीवर झालेला अत्याचाराचा बदला कसी घेते याचे रहस्य या वगनाट्यात दडलेले आहे. त्याचबरोबर समाजप्रबोधन करणारे आहे ह्याचा आस्वाद घेण्यात रसिकवर्ग आतुर आहे आणि आई जीवदानी कला फाऊंडेशनच्या वतीने रसिकांना आग्रहाचे निमंत्रण करीत आहेत. अधिक माहितीसाठी देवेंद्र दुर्गोली - ८६९१८००७६१, निलेश दूर्गोली -९०८२२०९२९७, हरीश भुवड - ९२८४४३९८४०, अविनाश कारकर -८४२४९९०८६५, संजय मोगरे - ९०२९६४१५७३

No comments:

Post a Comment

आई जीवदानी कला फाऊंडेशन महाराष्ट्र (रजि.) तर्फे नमन प्रेमींसाठी साहित्य संघ मंदिर येथे बहारदार कार्यक्रमाचे आयोजन !

आई जीवदानी कला फाऊंडेशन महाराष्ट्र (रजि.) तर्फे नमन प्रेमींसाठी साहित्य संघ मंदिर येथे बहारदार कार्यक्रमाचे आयोजन ! प्रतिनिधी - ...