मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
घाटकोपर, (केतन भोज) : घाटकोपर पश्चिम येथील मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा कोर्स आणि सारथी महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांच्या मार्फत मराठा/कुणबी युवक आणि युवतींसाठी राबविण्यात येणाऱ्या मोफत कोर्सला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मायक्रोलिंक कॉम्प्युटर्सचे संचालक सचिन पांडुरंग मनवळ यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितले की आमच्या संस्थेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सारथी महामंडळाकडून देण्यात येणारा मोफत कॉम्प्युटर डिप्लोमा कोर्स योजना राबविली जात आहे. ही योजना २०२३ पासून निरंतर राबवित असताना असा अनुभव आला आहे की, सदर योजनेसाठी विभातील अनेक गोरगरीब गरजू कुणबी/मराठा युवक युवतींना आम्ही भेटलो आणि त्यांना या योजनेची सविस्तर माहिती देत त्यांना त्यांच्या करियर साठी कसा फायदा होणार आहे याची सविस्तर माहिती त्यांना दिली. तसेच याबाबत विद्यार्थी वर्गाकडून ही सहकार्य लाभले. त्यामुळे ही योजना मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर पश्चिम याठिकाणी उत्कृष्टरित्या राबविली जात आहे. या सारथीच्या योजनेच्या माध्यमातून समाजातील अनेक गरजू होतकरू विद्यार्थ्यांना कॉमप्युटर नॉलेज देऊन त्यांना त्यांच्या व्यवसाय व नोकरीसाठी सहकार्य करणे हा त्यामागचा हेतू आहे. असे मनवळ यांनी सांगितले. या योजनेचा महाराष्ट्र शासनाच्या सारथी महामंडळ व महाराष्ट्र नॉलेज को.लि च्या माध्यमातून महाराष्ट्रभर ही योजना राबविली जात आहे. तसेच या अनुषंगाने विविध कार्यक्रम राबवून लाभार्थीपर्यंत ही योजना पोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
No comments:
Post a Comment