श्रद्धा सबुरी रेल्वेप्रवासी भजन मंडळाचा २५वा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन व भव्यदिव्य भजन स्पर्धा उत्साहात संपन्न !
**सुप्रसिद्ध हरि किर्तनकार साध्वी सोनाली दीदी करपे यांनी जिंकली श्रोत्यांची मने
मुंबई - ( दिपक कारकर )
श्रद्धा सबुरी भजन मंडळाचा नुकताच नामयज्ञ,भजन स्पर्धा व कीर्तन सोहळा रविवार दि. २ फेब्रुवारी २०२५ रोजी नालासोपारा ( पूर्व ) येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दिप प्रज्वलन, प्रतिमा पुजन, जगाला तारणारा ग्रंथ अर्थात ज्ञानसिंधु ज्ञानेश्वरी ग्रंथ पुजन, श्री सत्यनारायण महापूजा सह विषेश इंडियन आयडॉल फेम गायनाचार्य राहुल खरे आणि तालमणी रूक्षीकेश शिंदे या मान्यवर परीक्षकांची पंचपदी ऐकून श्रोते भारावून गेले. त्याचबरोबर दुपारी महिलांचे हळदीकुंकू, स्नेहभोजन व संध्याकाळी ह.भ.प.सोनाली दिदि करपे यांचे कीर्तन श्रवण करण्याचे भाग्य रसिक श्रोत्यांना लाभले.कीर्तन साथ म्हणून संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी संप्रदाय मंडळ वसई-विरार गायनाचार्य ह.भ.प.सदानंद गायकवाड मृदुंग महामेरू ह.भ.प. संदीप जाधव विणेकरी हुले बाबा तसेच चोपदार ह.भ.प.सचिन पवार महाराज व सर्व वारकरी मंडळी उपस्थित होते.
दरम्यान सदर कार्यक्रमाच्या नियोजनासह सामाजिक पटलावर उल्लेखनीय कार्य करणारे जयराम पवार ( माऊली ) व अरविंद मोरे ( माऊली ) यांना समाजकार्य पुरस्काराने गौरविण्यात आले.
सदर भव्य दिव्य सोहळ्यानिमित्त आयोजित भजन स्पर्धेत विजेते प्रथम क्रमांक वारकरी भजन मंडळ, द्वितीय क्रमांक ओम साईराज भजन मंडळ, तृतीय क्रमांक आई जिवदानी भजन मंडळ, उत्तेजनार्थ प्रथम ओम गुरूदेव भजन मंडळ, उत्तेजनार्थ द्वितीय ब्रह्मानंद भजन मंडळ, उत्तेजनार्थ तृतीय छंद हरिनामाचा भजन मंडळ, उत्तेजनार्थ चतुर्थ सच्चिदानंद भजन मंडळ, उत्कृष्ट गायक पांडुरंग कृपा भजन मंडळ, उत्कृष्ट चकवा आवड हरिनामाची भजन मंडळ, उत्कृष्ट डफली हेरंब भजन मंडळ,उत्कृष्ट रिदम ओंकार ज्योतिर्लिंग भजन मंडळ.उत्कृष्ट कोरस समर्थ कृपा भजन मंडळ, ह्या सर्व विजेत्या मंडळाचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. सदर सोहळ्याला आमदार क्षितीज ठाकूर, सभापती प्रशांत राऊत, समाजसेवक संदीप कासरूंग आदी विविध क्षेत्रातील प्रमुख मान्यवर तसेच श्रद्धा सबुरी भजन मंडळाचे आजी-माजी प्रमुख मार्गदर्शक मंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती लाभली होती.
उपरोक्त मंडळाचे संस्थापक ज्ञानेश्वर गावडे, अध्यक्ष प्रकाश आग्रे, कार्याध्यक्ष राजेश पातेरे,सचिव जिवन पाटील तसेच सर्व कार्यकारीणी यांनी अहोरात्र मेहनत करून हा सोहळा उभा केला या मध्ये संत सेवा भजन सामाजिक संस्थेचे पदाधिकारी जयराम पवार, विनोद चव्हाण, जनार्दन दयाळकर, प्रेमनाथ गुरव, जिवन मोरे, राजू दवंडे, शिवाजी भिनत, सुरेश बेकरे, जनार्दन शिंदे, प्रनव लांबाडे, दिपक धनावडे, नितीन रसाळ,सर्व भजनी मंडळी संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी संप्रदाय भजन मंडळ, ह.भ.प.योगेश बेर्डे, जारंडे माऊली, ह.भ.प.राहुल जाधव, भिकाजी सुतार, राजकीय सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेत वेळ सिग्नल लाईटमॅन म्हणून ह.भ.प.प्रकाश कदम यांनी कार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेश कदम यांनी केले. पसायदान व नंतर महाप्रसाद करून ह्या भव्यदिव्य सोहळ्याची सांगता झाली.मंडळाच्या आजी-माजी कार्यकारी पदाधिकारी सदस्य व महिला सभासद यांचे मोल्याचे सहकार्य लाभले. सदर उपक्रमाचे विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment