Friday, 7 February 2025

"सिद्धार्थ महाविद्यालयात रमाबाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती वकृत्व स्पर्धेद्वारे संपन्न "

"सिद्धार्थ महाविद्यालयात रमाबाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती वकृत्व स्पर्धेद्वारे संपन्न "

सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, महिला विकास कक्षाच्या पुढाकाराने, मातोश्री रमाबाई आंबेडकर यांची १२७वी जयंती यावर्षी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करून शुक्रवार, दि. ७/२/२०२५ रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात साजरी करण्यात आली. या स्पर्धेसाठी जाणीवपूर्वक *'त्यागमूर्ती रमाई, ज्ञानज्योती सावित्रीबाई फूले व राजमाता जिजाऊ' यांचा त्याग व संघर्षमय जीवनकार्य* असे तीन विषय सहभागी विद्यार्थांना देण्यात आले होते. जेणेकरून त्यांनी वरील विषयावर अभ्यासपूर्ण मते आत्मविश्वासाने मांडावीत व उपस्थित विद्यार्थी /शिक्षक श्रोत्यांपर्यंत माहीती पोहोचवावी.
   

सकाळी ठिक ११ वाजता उपप्राचार्य डॉ. समीर ठाकूर यांच्या हस्ते व डॉ. शशिकांत मुंडे, डॉ. सुनिल गायकवाड व डॉ. भावना राठोड यांच्या उपस्थितीत रमाई व बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार‌ अर्पण करून प्रथेप्रमाणे सामुहीक बुद्धवंदना घेतली. सर्वप्रथम ११वीच्या विद्यार्थांनी रमाईंच्या जीवनावर काही सामुहीक गीते व नृत्ये सादर केली व स्पर्धेला सुरुवात झाली.

स्पर्धेच्या सुरुवातीला उपस्थित विद्यार्थी स्पर्धकांना स्पर्धेचे नियम वाचून दाखवले. ही स्पर्धा इंग्रजी, हिंदी आणि मराठी अशा तीन भाषांमध्ये होती. सर्व सहभागीं विद्यार्थ्यांनी त्यागमूर्ती रमाई, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, व राजमाता जिजाऊ यांच्या संघर्षमय जीवन कार्यावर ७ मिनीटात त्यांची मते प्रभावीपणे तिन्ही भाषेत मांडली.

या स्पर्धेत पहिले पारितोषिक ११वीच्या  *कु. यास्मिन मोरब* या विद्यार्थिनीने पटकावले, तिला एक भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, द्वितीय पारितोषिक एस वाय बि कॉमच्या *कु. नाझ रायनी* या विद्यार्थिनीने जिंकले, तिला देखिल एक भेटवस्तू आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात केले, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक  ११वी च्या *कु. तनस्वी यादव* ला मिळाले, तिलाही एक भेटवस्तू व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. पारितोषिक विजेत्या सर्व स्पर्धकांनी इंग्रजी भाषेत त्यांचे वकृत्व उत्तमरित्या सादर केले. 

स्पर्धेदरम्यान ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. उमाजी जाधव, डॉ. भावना राठोड व प्रा. निर्मला कांबळे-सोनावणे यांनी देखिल रमाई, जिजाऊ आणि सावित्रीमाईच्या अतूलनिय  समाजकार्या बद्दल त्यांचे मनोगत थोडक्यात व्यक्त केले. या स्पर्धेसाठी ज्युरी म्हणून उपप्राचार्य डॉ. समीर ठाकूर  डॉ. विष्णू भंडारे व डॉ. सुनिल गायकवाड यांनी काम पाहिले. महिला विकास कक्षाच्या प्रमुख, प्रा. राधा कनकामल्ला यांच्या नेतृत्वाखाली प्रा. कांबळे कुंदन, दिपक पगारे, रूबी मरिया, अलिना उस्मानी, कौसर चोहान, सुनयना नंदेश्वर,पूनम देवरे, झीनत खान इत्यादी सर्व प्राध्यापकांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मनापासून भरपूर परिश्रम घेतले. तसेच ज्युनिअर कॉलेजच्या सर्व महिला प्राध्यापिका व उपप्राचार्य सहभागी झाले होते. 

*मुंबई प्रतिनिधी - डॉ. विष्णू भंडारे*

No comments:

Post a Comment

"सिद्धार्थ महाविद्यालयात रमाबाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती वकृत्व स्पर्धेद्वारे संपन्न "

"सिद्धार्थ महाविद्यालयात रमाबाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती वकृत्व स्पर्धेद्वारे संपन्न " सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त...