Tuesday, 8 June 2021

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या राज्य परिवहन महामंडळ शाखेच्या वतीने एसटी महामंडळ वाचविण्यासाठी राज्यभरात काळीफीत आंदोलन !

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या राज्य परिवहन महामंडळ शाखेच्या वतीने एसटी महामंडळ वाचविण्यासाठी राज्यभरात काळीफीत आंदोलन !


        बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : एसटी महामंडळ वाचविण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील २५० आगारात व ३१ विभागीय कार्यालयात एकदिवसीय काळी फीत बांधून आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ राज्य शाखा महाराष्ट्र व शाखेच्या इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या १२ संघटना व बामसेफच्या १७ सामाजिक संघटनेच्या माध्यमातून ३५८ तालुक्यात व ३६ जिल्ह्यात MSRTC च्या आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन केले आहे. एसटी सामान्य बहुजनांची जीवनवाहिनी आहे.
कारण एसटी मुळेच आज समाजातील खेड्यापाड्यातील मुलं शिक्षण घेत आहेत. तशाच प्रकारे वृद्ध अपंग यांना सुद्धा एसटी मोठ्या प्रमाणामध्ये जीवनदानी ठरलेली आहे.
     कारण या गरीब लोकांसाठी ST अनेक योजना राबवत असते. या योजनांचा लाभ सामान्य माणसं विद्यार्थी वृद्ध अपंग यांना होत आहे. त्यामुळे जर येणाऱ्या काळात एसटी महामंडळाचे खाजगीकरण झाले तर सामान्य माणसाचे खुप हाल होतील. आज खेड्यापाड्यांमध्ये एसटी धावत आहे त्यामुळे या लोकांचे शहरांमध्ये येणे जाणे सोयीचे झाले आहे. परंतु जर खाजगी कारणांमध्ये खाजगी मालकाने अशाप्रकारे लोकांना येण्या-जाण्यासाठी असणारी एसटी जर बंद केली किंवा आम्हाला परवडत नाही या कारणाने एसटी बंद केली तर सामान्य माणसाची शहराबरोबरची नाळ तुटली जाईल, म्हणून यासाठी एसटी वाचली पाहिजे. म्हणून महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्हे ३५८ तहसील याठिकाणी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या ट्रेड युनियनच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले. माणगाव येथे अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले. या यासाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे माणगाव तालुका अध्यक्ष दीपक मोरे, बामसेफचे रायगड जिल्हाध्यक्ष किरण मोरे, बहुजन क्रांती मोर्चा चे रायगड जिल्हा संयोजक मिलिंद साळवी, भारत मुक्ती मोर्चाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष राकेश मोरे, बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क चे रायगड जिल्हा अध्यक्ष कासे भारतीय विद्यार्थी मोर्चा चे महाराष्ट्र उपाध्यक्ष संकेत कासारे, विश्वदीप कासे इत्यादी कार्यकर्ते हजर होते. त्याचबरोबर एसटी महामंडळाचे कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते विशेष किरण अडखळे सर, अहिरे सर, व विनोद हाटे सर, या एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला. लीगल ॲडव्हायझर म्हणून एड. जयेश पवार, तेजस कासे, बहुजन मुक्ती पार्टीचे  सुनील गायकवाड, संदेश साळवी उपस्थित होते. आज एसटी महामंडळाच्या अनेक अनेक संघटना आहेत, त्यांनी सुद्धा या आंदोलनात आपला सहभाग नोंदवला.  
      खाजगीकरणा मुळे केवळ कर्मचारी देशोधडीला लागणार नसून या कर्मचाऱ्यांच्या पगारावर त्याच्या कुटुंबीयांचा होणारा उदरनिर्वाह येणाऱ्या काळात थांबणार आहे. याचाच अर्थ या कुटुंबाची येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात उपासमार होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर समाजामध्ये एसटी महामंडळ जर खाजगी झाले तर गावात गावात खेड्यात धावणाऱ्या एसटी येणाऱ्या काळात बंद करून खाजगी लूट मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. या आंदोलनास मार्गदर्शन करताना कासेसर बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क रायगड जिल्हा अध्यक्ष यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनात त्यांनी सध्य परिस्थितीवर प्रकाश टाकला, आणि ही समस्या केवळ कामगारांची नसून ही आपल्या समाजाची समस्या आहे आणि या समस्येला आधार बनवून आम्ही या लढ्यात उतरलो आहोत असे सांगितले. व कामगारांच्या पाठीशी आता समाज आहे त्यामुळे कामगारांनी घाबरण्याचे कारण नाही असे निश्चित पणे सांगितले. आता ही लढाई केवळ कर्मचारी लढणार नसून समाज एसटीची लढाई लढणार आहे. हा लढा आम्ही गाव खेड्यापर्यंत घेऊन जाणार आहोत, व लोकांमध्ये जागृती करणार आहोत. समाजामध्ये आंदोलनाचे वातावरण तयार करून शासनाला खाजगी करण्यापासून परावृत्त करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर माणगाव डेपो चे मॅनेजर यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले तसेच या निवेदनाची प्रत माननीय तहसीलदार माणगाव यांना देण्यात आली शेवटी दीपक मोरे माणगाव तालुका राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ यांनी आभार प्रदर्शन करून या आंदोलनाची समाप्ती करण्यात आली.

No comments:

Post a Comment

ज्येष्ठांनी मदतीसाठी ‘एल्डर लाईन १४५६७’ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन !!

ज्येष्ठांनी मदतीसाठी ‘एल्डर लाईन १४५६७’ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन !! पुणे, प्रतिनिधी : देशभरातील ज्येष्ठ नागरिक...