Tuesday, 8 June 2021

कल्याण चिकनघर येथील सबरजिस्टार कार्यालयांमध्ये एंजटांना खुर्ची तर सर्वसामान्यांना धूळयुक्त परशी, कोरोनाचे नियम पायदळी !

कल्याण चिकनघर येथील सबरजिस्टार कार्यालयांमध्ये एंजटांना खुर्ची तर सर्वसामान्यांना धूळयुक्त परशी, कोरोनाचे नियम पायदळी ! 


कल्याण, (संजय कांबळे) : शासनाला लाखोंचा प्रत्यक्ष महसूल मिळवून देणाऱ्या दुय्यम निबंधक अर्थात सबरजिस्टार कार्यालयांमध्ये एंजटांना मान सन्मान 'साहेबांच्या' समोर बसायला खुर्ची तर ज्यांच्या जिवावर महसूल मिळतो त्या सर्वसामान्य जनतेला मात्र कार्यालयातील जिन्याच्या धूळयुक्त परशीवर किवा खाली झाडाखाली ताटकळत उभे राहावे लागत आहे. विशेष म्हणजे कार्यालयात एंजटामुळे सोशलडिंस्टिंग, मास्कचा वापर, सेनिटायझर आदी कोरोनाचे नियम पायदळी तुडवत असलेचे चित्र कल्याण चिकनघर येथील सबरजिस्टार कार्यालयांमध्ये दिसून आले.


मालमत्ता अस्तांतर कायदा १८८२या कायद्यानुसार मालमत्तेची नोंदणी /रजिस्टर केली जाते. ज्या मालमत्तेची किंमत १०० पेक्षा अधिक आहे. अशा मालमत्तेची संबधित नोंदणी करणे अनिवार्य आहे. यातून शासनाला मुद्रांक शुल्क व नोंदणी फी च्या रुपाने महसूल मिळतो. कल्याण डोंबिवली परिसरात अशी ५ दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. यामध्ये कल्याण चिकनघर, कर्णिक रोडवरील होलीक्राॅस हाॅस्पिटल जवळ, कल्याण पुर्व तिसगाव आणि डोंबिवली २ यांचा समावेश आहे
खरेदीखत, साठेकरार, कुलमुखत्यारपत्र, वाटणी पत्र, हक्कसोड पत्र, गहाणखत, इ लिव्ह अॅड लाईन्स, भाडेपट्टा विकास करार आदी दस्तऐवज या कार्यालयात नोंदणी केले जातात. यातून मिळणारे मुद्रांक शुल्क व नोंदणी फी यातून शासनाला लाखोंचा महसूल मिळतो. कल्याण चिकनघर येथील सबरजिस्टार कार्यालयांमध्ये दररोज (कोरोना काळ) अपवाद वगळता कमीतकमी ४० ते ५० आणि जास्तीत जास्त १०० डाक्युमेंन्ट नोंदणी होतात. मालमत्तेच्या मुल्यांकनानूसार मुद्रांक शुल्क व नोंदणी फी आकारली जाते. यासाठी खरेदी विक्री करणारे आणि साक्षीदार यांना कार्यालयात यावे लागते. ठाणे जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळे दुय्यम निबंधक असतात. बदलापूर व मुरबाड हा भाग ग्रामीण भागात मोडतो तर उर्वरित शहरी भागात?
कल्याण मधील चिकनघर हे कार्यालय कायम वर्दळीचे असते. हे कार्यालय म्हणजे कोंडवाडा किंवा खुराडे आहे हेच कळत नाही. पहिल्या मजल्यावर सबरजिस्टार व क्लार्क तर यांच्याच समोरील खोल्यांच्या मध्ये नोंदणी झालेले दस्तऐवज रद्दीच्या भंगार गोडाऊन सारखे दिसते. तर या कार्यालयाची ओळख दर्शवणारा फलक जमीनीवरचं धूळखात उभा आहे.
अशातच या कार्यालयाचे प्रमुख असलेले सबरजिस्टार यांचे तर नियम भन्नाटच! सर्वसामान्यांना भेटायला यायचे असेलतर कोरोना आहे, गर्दी करु नका? असे उत्तर तर एंजटांना मात्र स्वतः समोरील खुर्ची! हे महाशय विनामास्क कार्यालयात कुठेही बिनधास्त फिरत, क्लार्क यांच्या केबिनमध्ये, दस्तऐवज विभागात, अगदी कुठेही
मात्र ज्यांच्या जिवावर तूम्हाला लाखोंचा महसूल मिळतो त्यांना एखाद्या कोपर्‍यात किंवा खाली झाडाखाली उभे राहून एंजट कधी बोलावतो याची वाट पाहात ताटकळत उभे केले जाते. याचा अर्थ काय? शासनाची नाममात्र फी व शुल्क असताना हे महाशय लाखो रुपये या लोकांकडून घेतात. ते कोणासाठी व कशासाठी? याच्यात कोण कोण" भोगवाटेदार" हे न समजण्याइतपत जनता दुधखुळी नाही. कोणत्याही गोष्टीला एक मर्यादा /अंत असतो हे  लक्षात घ्यायला हवे. असे एका सामाजिक कार्यकर्त्यांने सांगितले.
कल्याण चिकनघर रजिस्टर कार्यालय समस्येच्या गर्तेत अडकले आहे. कार्यालयाच्या समोरच कचरा डेपो आहे. याची दुर्गधी सर्वत्र पसरलेली, स्वच्छतेचा अभाव, कार्यालयात एंजटांची गर्दी, अस्ताव्यस्त पडलेले दस्तऐवज, पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह यांचा अभाव, वयोवृद्ध, अपंग यांची मोठी गैरसोय आदी प्रश्नाकडे कार्यालय प्रमुखांनी जरा लक्ष दिले तर मायबाप जनतेवर मोठे उपकार होईल असे एका जेष्ठ नागरिकांनी मत व्यक्त केले. काही राज्यांमध्ये एंजटांना अधिकृत मान्यता देण्यात आली आहे परंतु आपल्या कडे नाही. असे एका वकील महोदयांनी सांगितले तर असे काही प्रकार असतील, स्वच्छता नसेल कोरोनाचे नियम पायदळी तुडवले जात असतील तर संबंधित सब रजिस्टर यांना कडक सूचना देण्यात येतील असे कल्याण तहसीलदार दिपक आकडे यांनी सांगितले. 

1 comment:

  1. Fully agree as agents are treated as above the law and tax payers as begger

    ReplyDelete

ज्येष्ठांनी मदतीसाठी ‘एल्डर लाईन १४५६७’ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन !!

ज्येष्ठांनी मदतीसाठी ‘एल्डर लाईन १४५६७’ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन !! पुणे, प्रतिनिधी : देशभरातील ज्येष्ठ नागरिक...