दिलासादायक ! राज्यातील रुग्णसंख्या वाढीचा आलेख उतरताच !!
मुंबई : राज्यात आजपासून (7 जून) विविध जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात आलं आहे. अनलॉक केल्यामुळे कोरोना रुग्णांची वाढ होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र त्यानंतरही रुग्ण संख्येमध्ये राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट कायम आहे. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 11 हजारांपेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात एकूण 10 हजार 219 रुग्णांची नोंद झाली आहे.
दिवसभरात एकूण 21 हजार 81 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 154 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 55 लाख 64 हजार 348 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर (Recovery Rate) हा 95.25% इतका झाला आहे. तर मृत्यूदर 1.72% इतका आहे. राज्यात एकूण 1 लाख 74 हजार 320 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. म्हणजेच इतके रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.
No comments:
Post a Comment