केळनी येथील दोन मैत्रिणींची पोटगावच्या जंगलात गळफास घेऊन आत्महत्या?
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील केळणी आदीवाशीवाडी येथे राहणाऱ्या दोन मैत्रिणींनी मुरबाड तालुक्यातील पोटगावच्या जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
केळणी आदीवाशी वाडीत राहणाऱ्या कु शारदा अविनाश अंबिज (१८) आणि कु मनिषा निरगुडे (१९) या दोघी जिवलग मैत्रीणी होत्या. मागील शुक्रवारी आम्ही पावण्या जातो असे सांगून त्या घराबाहेर पडल्या. त्या परत आल्याच नाहीत. आज परिसरातील काही आदिवासी मुले जंगलातील भाज्या आणण्यासाठी गेले असता शारदा आणि मनिषा यांचा मृतदेह झाडाला लटकताना आढळून आला. हा प्रकार मुरबाड पोलीसांना समजताच ते घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी मुंबई च्या जेजे रुग्णालयात पाठविण्यात आला होता. पोस्टमार्टेम नंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केले. यावेळी अंत्यत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
परंतु तोपर्यंत यांच्या उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत होत्या. कोणी बोलत या मुली जंगलातील भाज्या विकण्यासाठी कल्याण मुरबाड महामार्गावर पोटगाव येथे बसल्या होत्या. त्यांना कोणीतरी अज्ञातानी उचलून नेऊन सामूहिक बलात्कार केला. परंतु हे खोटे असल्याचे लवकरच समोर आले. कारण मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराडे यांना विचारले असता यातील एक मुलगी कायम आजारी असायची तर दुसरीला घरातील कामांचा त्रास व्हायचा याच नैराश्यातून यांनी आत्महत्या केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या सर्व अफवा आहेत असेही ते म्हणाले.
No comments:
Post a Comment