स्वराज्यनिती च्या बंधनात शिवराज्य ब्रिगेड मैदानात !!
मुंबई : विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आदर्श घेत समाजाला अभिप्रेत अशी समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी शिवरायांनी स्वराज्यनिती अवलंबली. समाजकारण हेच राजकारण हे *शिवसुत्र* घेवून एक नवी व लोकशाहीला खरे स्वरुप असलेली समाज जागृत व्यवस्था व राज्यव्यवस्था निर्माण करण्याचा आम्ही संपल्प केला आहे. छत्रपतींचे स्वराज्य हे प्रत्येक व्यक्तीला आपलेसे वाटणारे राज्य होते ते खऱ्या अर्थाने आताच्या स्थितीत कसे सत्यात उतरेल यासाठी प्रयत्नशिल राहणे हा आमचा मानस आहे.
त्या सगळ्यासाठी सर्वांनी संघर्ष करण्याची गरज आहे. संघर्ष करीत असताना सर्व समाजाचा विकास हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही शिवराज्य ब्रिगेड या संघटनेची सुरुवात केली आहे. सर्वास पोटास लावणे हे छत्रपतींचे वाक्य सत्यात उतरवायचे असेल तर अर्थकारणाशिवाय समाजकारण होवूच शकत नाही म्हणून अगोदर प्रत्येक कार्यकर्ता हा स्वावलंबी असला पाहिजे म्हणून प्रत्येक क्रियाशील कार्यकर्त्याला उद्योजक शिबिर माध्यमातून मदत करून उद्योजकतेला प्राधान्य देणार आहोत असे संघटनेचे अध्यक्ष अमोल जाधवराव यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे उध्दघाटक मा. खासदार ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी केले. शिवराज्य ब्रिगेड च्या माध्यमातून पुन्हा एकदा नवी आशा मला मिळाली आहे. असे ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगितले. मराठा आरक्षणाचे चाललेले राजकारण थांबवून कुठे तरी महाराष्ट्र सरकार ने पुढाकार घेवून केंद्राकडे पाठपुरावा करून आरक्षणासाठी कायदा बनविण्यासाठी केंद्रावर दबाव तयार करणे गरजेचे आहे तरच मराठा समाजाला आरक्षण मिळेल अन्यथा काहीही होणार नाही. असे यावेळी ते म्हणाले.
या प्रसंगी खालील पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करून जबाबदारी देण्यात आली. शैलेश चव्हाण महासचिव महाराष्ट्र राज्य, नरेश जाधव सचिव महाराष्ट्र राज्य, विजय बल्लाळ कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य, सतिश देसाई उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, विकास चव्हाण कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, संतोष मुळम संघटक महाराष्ट्र राज्य तसेच सागर पगारे - जिल्हाध्यक्ष उत्तर मुंबई जिल्हा, लोकेश कुमार जिल्हाध्यक्ष उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा, वैभव शिंदे - जिल्हाध्यक्ष उत्तर मध्य मुंबई जिल्हा, प्रविण पाटिल - जिल्हाध्यक्ष दक्षिण मुंबई जिल्हा, शशिकांत नागांवकर -जिल्हाध्यक्ष दक्षिण मध्य मुंबई जिल्हा , प्रतिक सपकाळ - जिल्हाध्यक्ष ईशान्य मुंबई जिल्हा , समीर देसाई -जिल्हाध्यक्ष ठाणे जिल्हा, जगदिश घरत- जिल्हाध्यक्ष रायगड जिल्हा यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. येत्या महिनाभरामधे महाराष्ट्र दौरा घेवून इतर जिल्हा बांधणी सुरूवात करून संघटन मजबूतीकरणावर भर दिला जाणार आहे असही जाधवराव यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment