Monday, 7 June 2021

ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी व शहापूर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे किन्हवली येथे पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन

ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी व शहापूर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे किन्हवली येथे पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन !


शहापुर, (एस.एल.गुडेकर) :

       केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती भरमसाठ वाढविल्या आहेत, यामुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे, एकीकडे कोविड ची महामारी तर दुसरीकडे भरमसाठ महागाई यात सामान्य माणूस मात्र भरडला असला तरी मोदी सरकारला त्याचे काहीही सोयरसुतक राहिलेले नाही याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, आमदार. नानाभाऊ पटोले यांच्या आदेशाने केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात आज सोमवार दिनांक ७ जून २०२१ रोजी सकाळी ११ वाजता, किन्हवली मधील पेट्रोल पंपावर काँग्रेसचे ठाणे जिल्ह्यातील नेते दयानंद चोरघे व शहापूर तालुका अध्यक्ष महेश धानके यांच्या नेतृत्वाखाली दरवाढीच्या विरोधात आंदोलन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.


      याप्रसंगी बोलताना काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे म्हणाले की केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल दरवाढ करून सामान्य माणसाचे कंरबडे मोडले आहे, काँग्रेसने ७० वर्षात ७० रुपयांच्या पुढे पेट्रोल नेले नव्हते मात्र मोदी सरकारने ७ वर्षात १०० रुपयाचे पुढे पेट्रोल महाग केले आहे, पेट्रोल, डिझेल दरवाढीमूळे महागाई वाढली असून ही भाववाढ रद्द न केल्यास ठाणे जिल्ह्यात यापुढे उग्र आंदोलन छेडण्याचा चोरघे यांनी इशारा दिला, तर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेश धानके म्हणाले की पेट्रोल व डिझेल ची मूळ किंमत आणि प्रत्यक्ष किंमत यात प्रचंड तफावत आहे, केंद्रीय रस्ते व कृषी कराच्या नावाखाली केंद्राने लूट चालवली आहे, हे सरकार सर्वसामान्य लोकांच्या हिताचे नसल्याचे धानके यांनी सांगितले. या आंदोलनात तालुका अध्यक्ष महेश धानके, जिल्हा सरचिटणीस कृष्णा तुपे, ओबीसी प्रदेश सरचिटणीस रविंद्र परटोले, युवक अध्यक्ष अंकुश भोईर, जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र जोशी, इंटक तालुका अध्यक्ष भास्कर जाधव, किशोर पानसरे, ओबीसी तालुका अध्यक्ष पद्माकर वरकुटे, तालुका उपाध्यक्ष जयकुमार करण, युवक काँग्रेस माजी तालुका अध्यक्ष देवेन्द्र भेरे, गणेश विशे, डि.वाय.फाऊंडेशन तालुका उपाध्यक्ष तानाजी घागस, काँग्रेसचे कांतीलाल घोडा, रोहीत झुंझारराव इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी केंद्र सरकार व मोदींच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment

श्री कांडकरी महिला मंडळाचा हळदी- कुंकू समारंभ भोईवाडा - मुंबई येथे दिमाखात साजरा !

श्री कांडकरी महिला मंडळाचा हळदी- कुंकू समारंभ भोईवाडा - मुंबई येथे दिमाखात साजरा ! मुंबई (शांताराम गुडेकर) :        रत्नागिरी जि...