Sunday, 6 June 2021

ठाणे जिल्यातील शहापूर तालुक्यातील 'या' गावात अद्याप एकही कोरोना रुग्णाची नोंद नाही

ठाणे जिल्यातील शहापूर तालुक्यातील  'या' गावात अद्याप एकही कोरोना रुग्णाची नोंद नाही !


अरुण पाटील, भिवंडी :
           ठाणे जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असले तरी सद्या ठाणे जिल्ह्यातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. एकीकडे महाराष्ट्र राज्य कोरोना व्हायरस सारख्या संकट सामना करत असून  दिवसें-दिवस कोरोनाबाधितांचा आकडा कमी जास्त होत आहे. मात्र  ठाणे जिल्ह्यात असं एक गाव आहे जिथे एकाही कोरोनाबाधित रुग्णांची नोंद नाही. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात काळभोंडे हेच ते गाव.
            मार्च 2020 ला लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर जवळपास 440 दिवसांनंतरही या गावात एकही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झालेली नाही. विशेष म्हणजे, कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही या गावात शून्य प्रकरणे नोंदली गेलीत. आता आम्हीच  त्याच जोमानं तिसऱ्या लाटेचीही तयारी  करत असल्याचं गावच्या सरपंच देवकी एम. घिरा यांनी सांगितलं आहे. गावातल्या लोकांनी ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचं काटेकोरपणे पालन केल्यानेच हे शक्य झाल्याचे  घिरा यांनी सांगीतले.
         आम्ही अत्यावश्यक सेवा किंवा वैद्यकीय आपत्कालीन सेवा  वगळता इतर कोणालाही गावात प्रवेश दिला नाही. गावात प्रवेश करणाऱ्यांसाठी योग्य ती सोय करण्यात आली होती. गावाच्या प्रवेशाच्या ठिकाणी पूर्णपणे स्वच्छता ठेवण्यात आली होती. जो कोणी गावात प्रवेश करेल त्यासाठी काही नियम आखले होते, असं पोलीस भालचंद्र खडके यांनी सांगितलं.
        लॉक डाऊन काळात  डिलिव्हरी व्हॅन्स देखील गावाबाहेर थांबवण्यात यायच्या. आलेल्या सामान सॅनिटाइज करण्यात यायचं. तसंच आलेल्या सामानाचं वितरण रेशन दुकानं आणि इतर दुकानात केलं जायचं, असं ग्रामसेवक प्रशांत मर्के यांनी सांगितलं. दर आठवड्याला गावातले स्वयंसेवक ग्रामस्थांच्या शरीराचे तापमान आणि ऑक्सिजन पातळीचे मोजमाप करतात असं खडके सांगतात. आता तिसऱ्या लाट येन्या पूर्वीच काळभोंडे गावाने उपाय योजना तयार ठेवल्याचे खडके यांनी

No comments:

Post a Comment

श्री कांडकरी महिला मंडळाचा हळदी- कुंकू समारंभ भोईवाडा - मुंबई येथे दिमाखात साजरा !

श्री कांडकरी महिला मंडळाचा हळदी- कुंकू समारंभ भोईवाडा - मुंबई येथे दिमाखात साजरा ! मुंबई (शांताराम गुडेकर) :        रत्नागिरी जि...