स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून मोफत स्मार्ट मतदान कार्ड शिबिर !
कल्याण (प), प्रतिनिधी - नागरीकांच्या सततच्या मागणीनुसार व दैनंदिन जीवनात महत्त्वाच्या अशा कागदपत्रा पैकी एक मतदान कार्ड परंतु बहूसंख्य नागरीकांकडे स्मार्ट मतदान कार्ड उपलब्ध नाही अशा नागरीकांसाठी स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून मोफत स्मार्ट मतदान कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले आहे यामध्ये नागरीकांना जुने मतदान कार्ड, मतदान ओळखपत्र क्रमांक, आधार कार्ड, फोटो, मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे सादर करून स्मार्ट मतदान कार्ड साठी नोंदणी करण्यात येईल. सदर शिबीर दि.११ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२५ शंखेश्वर प्रेसिडेन्सी, शाॅप नं १६, आर. टी.ओ जवळ, टावरी पाडा, कल्याण प. येथे सकाळी १० ते २ या वेळेत असेल ,तरी नागरीकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन स्फूर्ती फाउंडेशन अध्यक्ष बजरंग तांगडकर, महिला प्रमुख शिल्पा तांगडकर, मार्गदर्शक, जेष्ठ पत्रकार शिवचरित्र व्याख्याते शांताराम तांगडकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment