Tuesday, 11 February 2025

घाटकोपर बर्वे नगर येथील श्री गजानन महाराज मंदिरात मोफत आरोग्य शिबिर संपन्न !

घाटकोपर बर्वे नगर येथील श्री गजानन महाराज मंदिरात मोफत आरोग्य शिबिर संपन्न !

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
           निरोगी जीवन हेच आयुष्याचे नंदनवन ,शरीर संपत्ती हेच मानवाचे धन असे गजानन महाराजांनी जन माणसात सांगितले होते त्याला अनुसरून शेगाव संस्थान संस्थांच्या वतीने विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवित असून महाराजांच्या १४६ व्या प्रकट दिनानिमित्त श्री गजानन महाराज मंदिर बर्वे नगर घाटकोपर येथील श्री गजानन महाराज सेवा परिवाराच्यावतीने एल अँड टी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पवई तसेच जे. व्ही. गोयल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरामध्ये सेवा व औषधे मोफत देण्यात आली असून वजन, रक्त व रक्तदाब तपासणी, डायबेटीस (मधुमेह) अनेमिया तपासणी अशा सर्व तपासण्या तज्ञ डॉक्टरांच्या वतीने करण्यात आल्या. डोळ्याची मशीन द्वारे तपासणी करून संबंधित रुग्णांना मोफत चष्म्याचे वितरण करण्यात आले, एल अँड टी संचालित पवई येथील निराली हॉस्पिटल मध्ये मोफत मोती बिंदू ऑपरेशन करण्या साठी काही रुग्णांची नोंद घेण्यात आली. एका लहान मुलाला दोन्ही कानाने ऐकू येत नाही त्या मुलाला पाच ते सहा लाख किंमत असलेली दोन्ही कानाची मशीन मोफत देण्यासाठी नोंद करण्यात आली. तसेच विभागातील २५१ रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला असून आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री गजानन महाराज परिवारातील सर्व महिला व पुरुष सेवेकरींनी अथक मेहनत घेतली तसेच लार्सन अँड टुब्रो चे विद्याधर राणे (गुणवंत कामगार) यांचे विशेष सहकार्य लाभले. 

      या मोफत आरोग्य शिबिराला घाटकोपरचे डॅशिंग आमदार राम कदम, माजी नगरसेवक दीपक बाबा हांडे, शाखाप्रमुख बाबू साळुंखे, बाळासाहेब हांडे, राजू शिरसेकर , निलेश जंगम, दिलीप बामणे, गजानन काकडे, वैभव आवटे पाटील, राजेंद्र पवार आदी मान्यवर व्यक्तींनी सदिच्छा भेट दिली. श्री गजानन महाराज मंदिर परिवाराच्या वतीने सर्व डॉक्टर व त्यांचे सहकारी आणि विशेष करून प्रोजेक्ट कॉर्डिनेटर सुशांत आव्हाड व प्रमुख मान्यवरांचे सन्मानपूर्वक स्वागत करून उपस्थित मान्यवरांचे आभार मानले असून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments:

Post a Comment

ज्येष्ठांनी मदतीसाठी ‘एल्डर लाईन १४५६७’ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन !!

ज्येष्ठांनी मदतीसाठी ‘एल्डर लाईन १४५६७’ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन !! पुणे, प्रतिनिधी : देशभरातील ज्येष्ठ नागरिक...