Wednesday, 23 June 2021

आर्ट ऑफ लिव्हिंग च्या माध्यमातून कोविड सेंटर लोणेरे येथे उपजिल्हा रुग्णालय माणगांवचे वैद्यकीय अधिक्षक डॉ प्रदिप इंगोले यांच्या उपस्थितीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे योगा प्रशिक्षण संपन्न !

आर्ट ऑफ लिव्हिंग च्या माध्यमातून कोविड सेंटर लोणेरे येथे उपजिल्हा रुग्णालय माणगांवचे वैद्यकीय अधिक्षक डॉ प्रदिप इंगोले यांच्या उपस्थितीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे योगा प्रशिक्षण संपन्न !


       बोरघर / माणगांव, (विश्वास गायकवाड) : माणगांव उपजिल्हा रुग्णालय संनियंत्रीत डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथील कोविड सेंटर मधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना श्री रवी शंकर महाराज यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून माणगांव उपजिल्हा रुग्णालयाचे कर्तव्यदक्ष कार्य तत्तपर वैद्यकीय अधिक्षक श्री प्रदीप इंगोले यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळावर दिनांक २२ जून रोजी योगा प्रशिक्षण देण्यात आले. 
       सदर योगा प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथील कोविड सेंटर मधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना योगा प्रशिक्षण कार्यक्रम प्रसंगी माणगांव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक माननीय डॉ प्रदिप इंगोले यांनी योगसाधनेचे मानवी जीवनातील महत्व पटवून देण्यासाठी आणि कोरोना संसर्ग टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी व खबरदारी या संदर्भात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना मौलिक आणि सविस्तर असे मार्गदर्शन केले. 
       या प्रसंगी डॉ डोईफोडे आणि आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत कोविड पार्श्वभूमीवरील शासनाने निर्देशित केलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून सदर योगा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...