मुरबाड, (मंगल डोंगरे) : गेली अनेक वर्ष ओबीसी समाज आपल्या विविध मागण्यांसाठी भांडत आहे. परंतु राज्य सरकार व केंद्र सरकार जाणून बुजून ओबीसींच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करुन ओबीसी समाजावर अन्याय करत असल्याची भावना ओबीसी समाजात होत असल्याने आता ओबीसी समाजही रस्त्यावर उतरुन आपल्या न्याय व हक्कासाठी भांडत आहे.
आज राज्य सरकार व केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व तहसिल कार्यालयांवर राष्ट्रीय ओबिसी महासंघाच्या वतीने जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. याचेच औचित्य साधुन मुरबाड तहसिल कार्यालच्या प्रवेशव्दारावर आज सकाळी ११ वाजता आंदोलन करुन तहसिल कार्यालय आंदोलनकर्त्यांनी दणानुन सोडले. "उठ ओबीसी जागा हो आंदोलनाचा धागा हो " "आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे" सरकारचा निषेध करुन घोषणा देण्यात आल्या. व आपल्या मागण्यांचे निवेदन मुरबाड तहसिल दार यांना देण्यात आले.
स्थानिक स्वराज्य संस्थेमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्यसरकारने कोर्टाच्या निर्णयानुसार कार्यवाही करावी, गेली कित्येक वर्ष ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेची मागणी केली जाते ती होत नाही ती करावी, मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करणे, नाॕन क्रिमिलेअरची जाचक अट रद्द करावी, ओबीसी मंञालय आहे पण निधीचा पत्ता नाही. अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. यामोर्चात कुणबी समाज संघटनेचे मुरबाड तालुका सरचिटणीस प्रकाश पवार, शिवसेना तालुका प्रमुख कांतिलाल कंटे, काॕंग्रेसचे तालुका अध्यक्ष चेतनसिंह पवार , माजी उपसभापती रामभाऊ दळवी, ठाणे जिल्हा परिषदेच्या सदस्या रेखाताई कंटे, समाजसेविका सुवर्णाताई ठाकरे, योगिता शिर्के, अॕडव्होकेट वैशाली घरत, अॕडव्होकेट विलास घरत, मिलींद मडके, प्रा. शिक्षक भालचंद्र गोडांबे, नरेश म्हाडसे सहभागी झाले होते. तर या आंदोलनाचे नियोजन ओबीसी जनमोर्चाचे तालुका संघटक उमेश पाटिल यांनी केले.


No comments:
Post a Comment