Wednesday, 23 June 2021

राज्यात रुग्णसंख्या दहा हजाराच्या घरात ! तर मृत्यूदर १.९९ टक्के !

राज्यात रुग्णसंख्या दहा हजाराच्या घरात ! तर मृत्यूदर १.९९ टक्के !

मुंबई : राज्यात रुग्णसंख्येने परत दहा हजाराचा आकडा पार केला आहे. नवीन कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जरी जास्त असले तरी लॉकडाऊन शिथिल झाल्यावर रुग्णसंख्या पुन्हा वाढल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ११ हजार ०३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९५.९३ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण १० हजार ०६६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली . 

तर, याच कालावधीत १६३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ११ हजार ०३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५७ लाख ५३ हजार २९० रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर १.९९ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण १ लाख २१ हजार ८५९ इतकी आहे.

No comments:

Post a Comment

मुंबई प्रभाग १४४ मध्ये राजकीय भूकंप; महिला शाखा संघटक ममता भंडारी यांचा शिवसेनेचा राजीनामा !!

मुंबई प्रभाग १४४ मध्ये राजकीय भूकंप; महिला शाखा संघटक ममता भंडारी यांचा शिवसेनेचा राजीनामा !! मुंबई (शांताराम गुडेकर) :         ...