दिलासादायक ! राज्यातील दुसरी लाट संपुष्टात येत असल्याचे चित्र !!
मुंबई : राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे सद्यस्थिती अत्यंत दिलासादायक आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (4 मे) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आजही कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा मोठा आहे.
राज्यात आज 14 हजार 152 नव्या कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. तर याच एका दिवसात राज्यात नवीन 20 हजार 852 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आज एकूण २८९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
राज्याच्या आरोग्यविभागाकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, आतापर्यंत राज्यात एकूण 55 लाख 07हजार 58 रुग्ण कोरोनामुक्त होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. तर सद्यस्थितीत राज्यात एकूण 1 लाख 96 हजार 894 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील आता 94.86% इतके झाले आहे.
No comments:
Post a Comment