मुरबाड मध्ये ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपाचे रास्तारोको आंदोलन !!
मुरबाड, (मंगल डोंगरे) : राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण कोर्टाने रद्द केले असून, ते पुन्हा मिळावे यासाठी ओबीसींनी अनेक आंदोलने केली असताना, राज्य सरकार कुठलीही निर्णायक भुमिका घेत नाही. त्यामुळे रद्द झालेले आरक्षण जसेच्या तसे मिळावे.म्हणून आज संपूर्ण राज्यभर रास्ता रोको, चक्का जाम आंदोलनाचे मुरबाड येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी
*ऊठ ओबीसी बांधवा ऊठ
लढण्या आपल्या हक्कांसाठी,
विजयी होण्या संघर्षातून
दाखवी आपुली एकजूट.*....
अशा घोषणा देत तिनहात नाका मुरबाड येथे ठिय्या करत,रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या वेळकाढूपणा आणि नाकर्तेपणामुळे राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण कोर्टाने रद्द केल्याच्या निषेधार्थ या बेजबाबदार सरकारचा धिक्कार करण्यासाठी तसेच ओबीसींचे राजकीय आरक्षण लागू झाल्याशिवाय राज्यात कोणत्याही निवडणूका घेऊ नयेत या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी मुरबाड तालुका आणि मुरबाड शहर तसेच भाजपा ओबीसी मोर्चा मुरबाड तालुका आणि मुरबाड शहर तर्फे कार्यसम्राट आमदार *मा. श्री. किसनजी कथोरे साहेबांच्या* प्रमुख उपस्थितीत
हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी भाजपाच्या सर्व सेलचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment