महाराष्ट्राची अनलॉक कडे वाटचाल सुरु ! रुग्णसंख्येत घट; रिकव्हरी रेट वाढला !!
मुंबई : राज्यातील करोना संसर्ग आता कमीकमी होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनलॉक प्रक्रिया सुरू केली आहे. सोमवारपासून पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात अनलॉक होणार आहे. करोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सच्या संख्येनुसार जिल्ह्यांची वर्गवारी करण्यात आली असून त्यावर आधारीत निर्बंध उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात १४ हजार ४३३ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, १२ हजार ५५७ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, २३३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण ५५,४३,२६७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९५.०५ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.७२ टक्के एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण १,८५,५२७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
No comments:
Post a Comment