Sunday, 6 June 2021

कल्याण पंचायत समितीमध्ये 'शिवस्वराज्य दिन' मोठ्या उत्साहात साजरा, म्हारळ ग्रामपंचायत झाली भगविमय !

कल्याण पंचायत समितीमध्ये 'शिवस्वराज्य दिन' मोठ्या उत्साहात साजरा, म्हारळ ग्रामपंचायत झाली भगविमय !


कल्याण, (संजय कांबळे) : अखंड महाराष्ट्रातील बहुजनांचे राजे इसवी १६७४ मध्ये ६ जून इंग्रजी तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराज झाले.. दुर्ग दुर्गेश्वर रायगडावरती राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. हाच दिवस राज्यात शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार कल्याण पंचायत समिती मध्ये शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहाने आणि आंनदी वातावरणात साजरा करण्यात आला. तर म्हारळ ग्रामपंचायत देखील या निमित्ताने रांगोळी व फुलांनी भगवीमय झाली होती. 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकादिवस हा राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेत 'शिवस्वराज्य दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला त्यानुसार आज कल्याण पंचायत समितीच्या सभापती श्रीमती अनिता वाकचौरे यांच्या हस्ते स्वराज्य गुढी ची पुजा करण्यात आली. 


यावेळी पंचायत समिती सदस्य श्रीमती दर्शना जाधव, रेश्मा भोईर, अस्मिता जाधव, पांडुरंग म्हात्रे, गटविकास अधिकारी श्रीमती श्वेता पालवे आणि इतर विभागाचे प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत गायन झाले, यानंतर जिल्हा परिषद शाळा निघू च्या शिक्षिका अनिता साळवे यांनी राज्याभिषेका विषयी सखोल माहिती दिली. 


तालुक्यातील म्हारळ ग्रामपंचायतीमध्ये देखील शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी स्वराज्य गुढीच्या भोवती सुंदर रांगोळी व फुलांची आरास करण्यात आली होती. सरपंच श्रीमती प्रगती प्रकाश कोंगिरे यांच्या हस्ते पूजा केली. यावेळी उपसरपंच श्रीमती अश्विनी निलेश देशमुख, सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामविकास अधिकारी नितीन देशमुख कर्मचारी अंगणवाडी सेविका व मदतनीस  उपस्थित होते. याप्रमाणे वरप कांबा, आदी ग्रामपंचायतींमध्ये देखील शिवस्वराज्य दिन साजरा केला गेला. 
शिवरायांनी सर्व प्रस्थापित सत्ता पालथ्या करून स्वराज्यात चा सार्वभौम मंगल कलश रयतेच्या झोळीमध्ये रिता करून रयतेची झोळी सुख, समृध्दी, समता व स्वातंत्र्याने भरली त्यामुळे त्यांना हा मानाचा मुजरा !

No comments:

Post a Comment

श्री कांडकरी महिला मंडळाचा हळदी- कुंकू समारंभ भोईवाडा - मुंबई येथे दिमाखात साजरा !

श्री कांडकरी महिला मंडळाचा हळदी- कुंकू समारंभ भोईवाडा - मुंबई येथे दिमाखात साजरा ! मुंबई (शांताराम गुडेकर) :        रत्नागिरी जि...