Sunday, 6 June 2021

जॉय सामाजिक संस्थेची आशा सदन अनाथालयला आर्थिक व वस्तू स्वरूपात मदत !

जॉय सामाजिक संस्थेची आशा सदन अनाथालयला आर्थिक व वस्तू स्वरूपात मदत !


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :

           जोगेश्वरीतील जॉय ऑफ गिविंग या सामाजिक संस्थेच्या वतीने नुकतेच आशा सदन अनाथालय डोंगरी मुंबई येथे वास्तव्यास असणाऱ्या १३५ मुलांसाठी २६०००/- रुपयांचा (सव्वीस हजार रुपये फक्त) धनादेश आणि पोहे, रवा आणि बिस्कीट देऊन सहकार्य करण्यात आले. अस्मिता संस्थेच्या वतीने देखील कडधान्य स्वरूपात मदत दिली गेली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अस्मिता या नावाजलेल्या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष मा. शेखर पारखी साहेब व विशेष अतिथी म्हणून नितीन जोग व रमेश म्हात्रे उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांना जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आरोग्यवर्धक तुळशीचे रोपटे भेट देण्यात आले. सदर मदत स्वीकारण्यासाठी अशा सदनच्या प्रशासनिक अधिकारी सौ. ज्योती टेमकर मॅडम या जोगेश्वरी येथे उपस्थित होत्या. सद्या सुरू असलेल्या लॉकडाउन-२ मध्ये सर्वच सुरळीत कामांना खीळ बसली असून सर्वसामान्य नागरिकांबरोबरच अनेक सेवाभावी संस्था, अनाथालय, वृद्धश्रम यांचेही आर्थिक गणित कोलमडून पडलंय. यासाठी सामाजिक भावनेतून एकत्र येत जॉय ग्रुपच्या सदस्यांनी स्वतः पुढाकार घेत अशा सदनला आता २०२१ व गेल्यावर्षी २०२० लॉकडाउन-१ मध्येही आर्थिक व वस्तू स्वरूपात मदत केली आहे. सामाजिक उपक्रम साजरे करण्यासाठी ग्रुप मधील अनेकजण सढळ हस्ते मदत करण्यास पुढे येतात व यामुळे नक्कीच समाजातील गोर-गरीब, वंचित घटकांना आम्ही सहकार्य करू शकतो व या सेवेचा आनंद ग्रुपमधील सर्वजण घेत असतात ..जॉय ऑफ गिविंग म्हणजेच दुसऱ्याला देण्यातला आनंद हा ग्रुपचा जो उद्देश आहे तो यामुळे सफल होत असल्याचे संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे सर यांनी सांगितले व ज्यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार तसेच अस्मिता संस्थेने जागा उपलब्ध करून दिल्याने त्यांचे देखील आभार मानण्यात आले. अनाथालयाला मदत सुपूर्द करण्यासाठी यावेळी जॉयचे पदाधिकारी शीलाताई येरागी, छायाताई राणे, मोनिका फर्नांडिस, सुजाता नार्वेकर, मानसी बाचल, भूषण मुळे, पश्चिम रेल्वेचे गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व माजी सैनिक चंद्रशेखर सावंत, सालम जिमचे संस्थापक सूर्यकांत सालम सर, मकरंद बाचल, ज्ञानेश्वर परब, तेजस टेमकर, प्रियांस हिरवे आदी मान्यवर उपस्थित होते. सोशल डिस्टनसिंग ठेवून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

No comments:

Post a Comment

"सिद्धार्थ महाविद्यालयात रमाबाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती वकृत्व स्पर्धेद्वारे संपन्न "

"सिद्धार्थ महाविद्यालयात रमाबाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती वकृत्व स्पर्धेद्वारे संपन्न " सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त...