Sunday, 6 June 2021

राज्यातील छोटे व्यवसायिक व कष्टकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करण्याचे आदेश राज्यपालांनी सरकारला द्यावेत - जनता दलाची राज्यपालांच्याकडे मागणी

राज्यातील छोटे व्यवसायिक व कष्टकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करण्याचे आदेश राज्यपालांनी सरकारला द्यावेत - जनता दलाची राज्यपालांच्याकडे मागणी


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
    गेले दीड वर्षे कोरोनाच्या या साथीमुळे राज्यातील छोटे व्यवसायिक व कष्टकरी यामध्ये घरेलू कामगार, बांधकाम कामगार, नाभिक, चर्मकार, परिठ बांधव, तसेच शेतकरी बांधव यांचे फार मोठे नुकसान झाले असून त्यामध्ये हातावर पोट असणाऱ्या लोकांनाही या कोरोनाच्या साथीचा झटका बसला आहे. त्यामुळे इतर राज्यांनी जशी भरीव मदत केली आणि महाराष्ट्र सरकारने पंधराशे रुपयांची तुटपुंजी मदत केली. त्यामुळे जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा.शरद पाटील, युवा प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे व शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना आज प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले आहे. देशातील छोटे व्यवसायिक व कष्टकऱ्यांमध्ये येणाऱ्या सर्व घटकांना न्याय मिळावा तसेच शेतकरी बांधव, घरेलू कामगार, बांधकाम कामगार, नाभिक, चर्मकार, परिठ बांधव यांच्यासह राज्यातील पत्रकार बांधव आपला जीव धोक्यात घालून समाजातील घडणाऱ्या घडामोडी जन्मानसापर्यंत पोहचवत असल्याने त्यांनाही फ्रंट लाईन दर्जा देऊन सर्वांना किमान दहा हजार रुपये सरकारने द्यावेत असे आदेश राज्यपाल महोदय यांनी सरकारला द्यावेत अश्या मागण्याचे निवेदन देण्यात आले.

No comments:

Post a Comment

"सिद्धार्थ महाविद्यालयात रमाबाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती वकृत्व स्पर्धेद्वारे संपन्न "

"सिद्धार्थ महाविद्यालयात रमाबाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती वकृत्व स्पर्धेद्वारे संपन्न " सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त...