Thursday, 1 July 2021

पंचायत समिती माणगांव आणि कृषी विभाग माणगांव यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती माणगांव येथे कृषी दिन साजरा !!

पंचायत समिती माणगांव आणि कृषी विभाग माणगांव यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती माणगांव येथे कृषी दिन साजरा !! 


      बोरघर / माणगांव, (विश्वास गायकवाड) : महाराष्ट्र शासन तालुका कृषी विभाग माणगांव व पंचायत समिती माणगांव यांच्या संयुक्त विद्यमानाने १ जुलै रोजी कृषी दिन पंचायत समिती माणगांव येथे साजरा करण्यात आला. 
      या वेळी तालुक्यातील सन २०२०-२१ या वर्षातील भात पीक स्पर्धेतील विजेते श्री. चिंतामण सत्वे, शिरसाड किसन गोगरेकर, दीपक तवटे, विळे या गावातील शेतकरी यांना मा. सभापती सौ. अलकाताई जाधव यांच्या हस्ते प्रमाणपत्र व फळझाड देऊन सत्कार करण्यात आला. 
    तसेच तालुक्यातील महिला शेतकरी गट यांना परसबागेतील भाजीपाला लागवड करण्यासाठी भाजीपाला व तूर बियाणे यांचे वाटप करण्यात आले. तसेच तालुक्यांमध्ये बॉयोगॅस योजना ग्रामपंचायत स्थरावर उत्कृष्टपणे राबविणारे ग्रामसेवक श्री, राहुल ठाकूर व नरेश तरडे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.     
     यावेळी श्री. लवटे कृषी विस्तारा अधिकारी यांनी वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल मार्गदर्शन केले. श्री. बी. व्ही. काप कृषि अधिकारी यांनी उपस्थितास कृषि दिनाचे महत्व व पंचायत समिती अंतर्गत कृषि विभागाचे विविध योजना याबद्दल माहिती दिली,  तसेच श्री. आर डी पवार तालुका कृषी अधिकारी माणगाव यांनी दिनांक २१ जून ते १ जुलै रोजी कृषी संजीवनी या मोहिमे अंतर्गत तालुक्यांमध्ये १५० गावांमध्ये १४५० शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन तसेच दहा टक्के खतांची बचत आणि खताचा वापर भात लागवडीच्या पद्धती, फळबाग लागवड इत्यादी उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगितले. कृषी संजीवनी मोहिमेचे समारोपावेळी माननीय सभापती अलकाताई जाधव यांच्या हस्ते पंचायत समितीचे आवारामध्ये वृक्ष लागवड करण्यात आली. 
      यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी सौ. नाखले मॅडम, कृषी विस्तार अधिकारी बी. व्ही. काप, अशोक मार्कड विस्ताराधिकारी,  श्री.  पडवळकर मंडळ कृषी अधिकारी गोरेगाव, श्री ससाने कृषी पर्यवेक्षक व कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ४८ तासात शब्दपूर्ती !

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ४८ तासात शब्दपूर्ती ! ** माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून ५ लाखांचा ध...