Sunday, 25 July 2021

रत्नागिरी, सातारा येथील रेड अलर्ट कायम ! रत्नागिरी जिल्ह्यात वीजपुरवठा हळूहळू सुरळीत!

रत्नागिरी, सातारा येथील रेड अलर्ट कायम ! 
रत्नागिरी जिल्ह्यात वीजपुरवठा हळूहळू सुरळीत!


रत्नागिरी : कोकणामध्ये पुढील २ दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेवरून रत्नागिरी आणि सातारा येथे 'रेड अलर्ट', तर रायगडमध्ये 'ऑरेंज अलर्ट' घोषित करण्यात आला आहे. सध्या वाशिष्टी नदीचे पाणी ओसरल्यामुळे कोकण रेल्वे चालू झाली आहे; मात्र मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट खचल्यामुळे हा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे महामार्गावर वाहनांची मोठी रांग लागली आहे.
या कालावधीत राज्यातील ४५ नागरिक बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.


पुरामुळे जिल्ह्यातील २१५ गावे प्रभावित झाली आहेत. महावितरणच्या मुख्य वाहिन्या, ट्रान्सफॉर्मर, विद्युत खांब आदी पाण्यात गेल्याने महावितरण कंपनीने दक्षता म्हणून या भागातील वीज पुरवठा खंडित केला आहे. ज्या ठिकाणी पाणी ओसरत आहे त्या ठिकाणी हळूहळू विद्युत पुरवठा सुरू करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील एकूण ४४२ गावांपैकी २२७ गावांमध्ये विद्युत पुरवठा सुरू झाला आहे. तर २१५ गावामधील विद्युत पुरवठा बंद आहे. एकूण ५५ उपकेंद्रांपैकी ४० केंद्र सुरू तर १५ बंद आहेत. २ हजार २१८ ट्रान्सफॉर्मरपैकी ९८९ सुरू आहेत. तर १ हजार २२९ बंद आहेत. महावितरणचे जिल्ह्यात ५ लाख ५४ हजार ९२१ वीज ग्राहक आहेत. त्यापैकी १ लाख ६५ हजार वीज ग्राहक अंधारात आहेत.

जास्तीत जास्त सुरक्षित पुरवठा करण्यावर आमचा भर आहे. नागरिकांनी सहकार्य करावे आणि संयम बाळगावा, असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे.

No comments:

Post a Comment

समाज हितासाठी झटणारा सामाजिक कार्यकर्ते - अशोक भोईर

समाज हितासाठी झटणारा सामाजिक कार्यकर्ते - अशोक भोईर ——————————————————————————— कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामधील न्...