ॲड.केवल उके यांची महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या "राज्य स्तरीय मार्गदर्शक समिती" सदस्यपदी निवड !!
_मुंबई दिनांक २५ जुलै २०२१: महिला व बालविकास मंत्री माननीय *ॲड.यशोमतीताई ठाकूर* यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या *महाराष्ट्र शासनाच्या "राज्य स्तरीय मार्गदर्शक समिती"* मध्ये नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य महासचिव *ॲड.डॉ.केवलजी उके* यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. समाजातील दुर्बल घटकांच्या विकासाचे प्रश्न, धोरण, कायदे, विकासाचे उपक्रम व सध्या सुरू असलेल्या योजनांचा सखोल अभ्यास करून त्याची अंमलबजावणी करण्याचे कार्य या समितीद्वारे करण्यात येणार आहे. दिनांक २३ जुलै २०२१ रोजी याबाबतचा शासननिर्णय महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने पारित केला आहे._
_ॲड.डॉ.केवलजी उके यांची यापूर्वी सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने "आंतरजातीय विवाह कायदा मसुदा समिती" व अत्याचार पीडितांच्या पुनर्वसनासाठी असलेल्या "राज्य आकस्मिकता योजना समिती" या दोन समित्यांवर नियुक्ती केलेली आहे. ऍड.केवलजी उके यांच्या सखोल अभ्यासामुळे व अनुभवामुळे शासनास नाविन्यपूर्ण योजना राबवण्यात आज पर्यंत बरीच मदत झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्रालयीन समितीवर त्यांची नियुक्ती झाल्याने राज्यातील दुर्बल,गोरगरीब, जनतेस मोठा दिलासा मिळाला आहे._
(डॉ. आदर्श भालेराव :- 8070705552)
_ॲड.केवलजी उके यांचा जनसंपर्क राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात असून क्रियशील व रचनात्मक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करते. अशावेळी गावागावातील सामान्य जनतेचे प्रश्न ॲड.केवलजी उके हे मंत्रालयीन बैठकांमध्ये मांडून जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी स्वतःचे सामाजिक कौशल्य पणाला लावतील व समाजातील महिला, बालके आणि दुर्बल घटकांन न्याय मिळवून देतील अशी माहिती अल-गिलानी मानवाधिकार परिषद-एएचआरसी (अल-गिलानी फाउंडेशन आणि अल-गिलानी - आंतरराष्ट्रीय अहलेबाइट कौन्सिलचे युनिट) महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व सतर्क पोलीस टाईम चे उपसंपादक व नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे.) या संघटनेचे ठाणे जिल्हा सल्लागार *मा.डॉ आदर्श भालेराव* यांनी दिली आहे._
No comments:
Post a Comment