महाराष्ट्र शासन १ ऑगस्ट महसूल दिन व महसूल सप्ताह दिनी शासकीय अधिकाऱ्यांचा गौरव !!
** उपविभागीय कार्यक्रमात लांजा तालुक्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव
कोकण (शांताराम गुडेकर /दीपक मांडवकर) :
महाराष्ट्र शासन उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय राजापूर येथे महाराष्ट्र शासना तर्फे शुक्रवार १ ऑगस्ट महसूल दिन (महसूल सप्ताहाचा पहिला दिवस) हा राजापूर उपविभागातील महसूल प्रशासनातील सन २०२४-२५ या महसूल वर्षात विविध स्तरावर उत्कृष्ठ काम करणारे लांजा तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राजापूर मा.डॉ. जॅसमिन मॅडम (भा. प्र. से) यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. त्यापैकी श्री.सुरेंद्र भोजे (महसूल नायब तहसीलदार), श्रीम. अस्मिता चोरगे (सहाय्यक महसूल अधिकारी), श्री. संतोष पांचाळ (मंडळ अधिकारी लांजा), श्रीम. कविता सिदम (महसूल सहाय्यक), श्रीम. सोनाली लिमये (ग्राम महसूल अधिकारी शिपोशी), श्री मंगेश हरचकर (शिपाई), श्रीम. अश्विनी लांजेकर (महसूल- सेवक देवधे) या सर्व कर्मचारी व अधिकारी यांचे कौतुक करून प्रशासनाला लोकाभूमीक व गतिमान करण्याकरिता केलेल्या उत्कृष्ट कामगिती वद्दल गौरविण्यात आले. कार्यालयीन कामात या पुढे माहिती व तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करून प्रशासकीय कामामध्ये नवनवीन कल्पकतेचा वापर करून आपले काम अधिक लोकाभिमुख व पारदर्शकतेने कराल याची खात्री दाखवून संपूर्ण लांजा व राजापूर उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयातून अधिकारी व कर्मचारी यांच्यावर शुभेच्छा वर्षाव व कौतुक करून महसूल दिन व महसूल सप्ताह दिनी साजरा करण्यात आला.
No comments:
Post a Comment