Friday, 1 August 2025

मनपा एन विभागातील नालेसफाई करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षा साधनांच्या किटवर ठेकेदाराचा डल्ला !!

मनपा एन विभागातील नालेसफाई करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षा साधनांच्या किटवर ठेकेदाराचा डल्ला !!

*** कारवाई करण्याची मागणी

घाटकोपर, (केतन भोज) : मुंबईत पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचू नये, म्हणून मुंबई महापालिकेतर्फे दरवर्षी नालेसफाई केली जाते. यासाठी पालिका कोट्यावधी रुपये खर्च देखील करते. तसेच यंदा आपल्या मुंबई महानगरपालिका एन विभागाकडून नालेसफाईचे टेंडर निघून नालेसफाई केली गेली असली तरी, ती नालेसफाई फक्त दिखाव्यापूर्ती केली गेली असल्याची दिसत आहे. त्यामुळे यंदा हवी तशी नालेसफाई झालेली दिसत नाही. मनपा एन विभागातील बऱ्याच प्रभागात ठिकठिकाणी नाल्यातील गाळ तसाच पडून आहे. त्यामुळे यंदा नालेसफाई केली गेली का यावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे, याशिवाय नालेसफाई करणाऱ्या कामगारांची सुरक्षितता खरोखरच धोक्यात आहे. 

अनेक ठिकाणी नालेसफाई करताना कामगारांना कंत्राटदाराकडून कोणतीही सुरक्षा साधने पुरवली जात नव्हती त्यामुळे त्यांचे आरोग्य आणि जीव धोक्यात होते. नालेसफाई करताना कामगारांना हातमोजे, बूट आणि इतर आवश्यक सुरक्षा उपकरणे दिली गेली नव्हती. यामुळे नाल्यातील कचरा आणि दूषित पाण्यामुळे कामगारांना त्वचेचे आणि इतर आरोग्यविषयक समस्या येऊ शकतात. तसेच मागे विक्रोळी पार्कसाईट मध्ये नालेसफाई करताना सुरक्षा साधना किटच्या अभावी एका कामगाराचा दुदैवी मृत्यू देखील झाला होता. ही घटना ताजी असताना देखील महापालिका एन विभाग आणि संबंधित नालेसफाईच्या कंत्राटदाराने यातून कोणताही बोध घेतलेला दिसत नाही. त्यामुळे अशी दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये म्हणून सदर नालेसफाईच्या कंत्राटदाराने यावेळी देखील कामगारांच्या सुरक्षेतेसाठी कोणतेही सुरक्षा साहित्य पुरवलेले दिसत नाही. तसेच अशी दुर्दैवी घटना पुन्हा घडल्यास याची जबाबदारी संबंधित एन विभाग प्रशासन आणि नालेसफाईचा कंत्राटदार घेणार का ? तसेच मग याला जबाबदार कोण ? तसेच यावेळी महापालिकेकडून नालेसफाईसाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराला कामगारांच्या सुरक्षतेसाठी दिलेल्या सेफ्टी किटच्या निधीवर ठेकेदाराने डल्ला मारला असून आपण या सर्वांची उच्चस्तरीय चौकशी करावी. आणि अशा बेजबाबदार कंत्राटदाराला कायमचे ब्लॅकलिस्ट करून त्यांच्यावर कठोरातील कठोर कार्यवाही करावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून केली जात आहे.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...