अखेर रायता पुलावरून वाहतूक सुरू, मोठ्या प्रमाणात वित्त हानी, पुरयोध्दांना 'मानाचा मुजरा,'!
कल्याण, (संजय कांबळे) : काल झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे उल्हास नदीस प्रंचड मोठा पुर आला, या पुराच्या पाण्याला इतका वेग होता कीं त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्वांना तो आडवा करीत होता असेच रायते पुलाच्या बाबतीत घडले, या पाण्यात पुलाचे संरक्षक पाईप तर वाहून गेलेच शिवाय पुलाच्या रायते बाजूकडील काही भाग पुर्ण पणे वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक गोवेली टिटवाळा मार्गे वळविण्यात आली होती. परंतु सर्व शासकीय, निमशासकीय तसेच इतर समाजसेवी लोंकाच्या माध्यमातून दुरुस्त करून आज दुपारी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यावेळी अनोख्या अशा माणूसकींचे दर्शन पाह्याला मिळाले.
गेल्या रविवारपासून कल्याण तालुक्यात पाउस पडत आहे, परंतु मंगळवारी व बुधवारी मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडला, यामुळे उल्हास नदीस पुर आला ,तसेच भातसा, काळू बारवी व उल्हास या नदयांना सुध्दा पुर आला, भातसा नदीस आलेल्या पुरात खडवली येथील पुलांचे डांबरकाम वाहून गेले, काळू नदीच्या पाण्यामुळे काकडपाडा यथील शतक-यांच्या शेतीचे बांध वाहून गेल्याने भात रोपेही वाहून गेली तर उल्हास नदीच्या पुराचे पाण्यात अनेकांचे संसार डोळ्यादेखत बुडाले, पुराचे पाणी अचानक वाढल्याने म्हारळ, वरप, कांबा, रायते, पावशेपाडा आदी गावातील घरामध्ये पाणी शिरल्याने संसार उपयोगी वस्तूचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने जिवीतहानी झाली नाही, या पाण्याचा वेग इतका होता की, कल्याण मुरबाड मार्गावरील म्हारळ, वरप, काबा या भागातील रस्ता अक्षरशः ओरबडून नेला.
कल्याण नगर महामार्गावरील रायते येथील उल्हास नदीवरील ब्रिटिश काळातील पुल जो सन १९३५ च्या आसपास बनविला होता, त्यांचे संरक्षक लोखंडी पाईप व रायते गावाकडील पुलाजवळील रस्ता पुर्ण पणे वाहून गेला, येथील नव्यानेच केलेले डांबरकाम नदीपात्रात पडले होते, तर पाईप वाहून गेले होते, या पुरामुळे मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे, परंतु सुदैवाने जिवीतहानी झाली नाही.
*पुरयोध्दांना'मानाचा मुजरा'-हवामान विभागाने काही दिवस अगोदरच ठाणेसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती, त्यानुसार प्रशासन ही सज्ज होते, परंतु बारवी डँम रिकामा असूनही उल्हास, भातसा,बारवी, आणि काळू नदीच्या परिसरात ढगफुटी सदृश पाऊस पडला,त्यातच समुद्राच्या भरतीची भर पडली, यामुळे म्हारळ, वरप, कांबा, पावशेपाडा येथील सोसायटी, राधाकृष्ण नगरी, शिवाणींनगर, दर्गानगर, शिवशक्ती काँलनी, ओमसाईबाबानगर, गावभाग, टाटापावर हाऊस, पेट्रोल पंप, मोरयानगर, आदी परिसरात पाणी भरल्याने एनडी आरफ टिमच्या बरोबरच येथील स्थानिक, योगेश देशमुख, विवेक गंभीरराव, निलेश कडू, वामन भोईर,गोट्या, अश्विन भोईर, आदींनी अनेकांची पुराच्या पाण्यात अडकलेल्या ची सूटका केली.
तर सन २००५,२०१९ आणि आणि आता म्हणजे २२ जुलै २०२१ या वेळ रायते पुलाचा बराच भाग वाहून गेला होता. यावेळी कांंबा येथील मोहन शेट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुलाचा रस्ता पुर्ववत /दुरुस्त करण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली, तर पुलावरून पाणी वाहत असताना काही अनुचित प्रकार घडू नये, गोवेली चौकीचे पोलीस व रायते गावात राम सुरोशे व त्यांचे सहकारी डोळ्यात तेल घालून सामाजिक काम करीत होते.
पाणी कमी होताच, विद्यूत मंडळांचे कर्मचारी जीव धोक्यात घालून विद्यूत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत होते, रस्ते विकास महामंडळाचे कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम, असे सर्व च शासकीय, निमशासकीय, विभागाचे कर्मचारी,तरुण मंडळी, आणि या सर्वांचे स्वतःच्या घरात पाणी भरले असताना, बातमीदारी करणारे पत्रकार या सर्वांना, जनतेचा मानाचा मुजरा.
आता अपेक्षा इतकीच आहे की, कोरोनाच्या संकटामुळे अगोदरचं ग्रासलेल्या,पिचलेल्या, बेजार झालेल्या गोरगरीब पुरग्रस्ताना 'मायबाप, सरकारे काहीतरी मदत/नुकसान भरपाई वेळत द्यावी.




No comments:
Post a Comment