Friday, 23 July 2021

मुसळधार पावसामुळे ६८ गाव पाड्यातील विज गायब ! "मोबाईल, पाणी योजना सह इतर सर्वच यंत्रणा ठप्प"

मुसळधार पावसामुळे ६८ गाव पाड्यातील विज गायब !
"मोबाईल, पाणी योजना सह इतर सर्वच यंत्रणा ठप्प"


टिटवाळा, उमेश जाधव :  बुधवारी रात्री पासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे सर्वत्र पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे महावितरण कंपनीची अनेक विद्युत उपकरणे नादुरुस्त झाल्याने ६८ गाव पाड्यातील विजपुरवठा खंडीत झाला आहे. वितरण कंपनीकडून दुरूस्तीचे काम प्रगतीपथावर सुरू आहे.


कल्याण तालुक्यातील टिटवाळा शहरीभागासह ग्रामीण भागाला पावसाने बुधवारी चांगलेच झोडपून काढले आहे. यामुळे अनेक ठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका विज वितरण कंपनीला देखील बसला आहे. यामुळे विजेचे पोल पडणे, विद्युत वाहिन्या तुटणे, कंडक्टर, झेम्पर उडणे, जीओडी तुटणे असे अनेक तांत्रिक बिघाड झाल्याने विजपुरवठा खंडीत झाला आहे. बुधवारी रात्री ११ वाजे नंतर टिटवाळा शहरी भागासह लगतच्या ६८ गाव पाड्यातील विजपुरवठा खंडीत झाला आहे. यामुळे येथील पाणी योजना, पिठाच्या गिरण्या, मोबाईल सह इतर सर्वच यंत्रणा ठप्प झाली आहे. विज खंडीत झाल्याने डेअरी फार्म वाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विज पुरवठा लवकरात लवकर कसा सुरळीत करता येईल यासाठी वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करत असल्याची माहिती उप कार्यकारी अभियंता धिरजकुमार धुवे यांनी दिली.

No comments:

Post a Comment

६३ वा नागरी संरक्षण व होमगार्ड्स संयुक्त वर्धापन दिन (सप्ताह) सांगता समारोप एचिव्हर्स कॉलेज, कल्याण येथे उत्साहात !!!

६३ वा नागरी संरक्षण व होमगार्ड्स संयुक्त वर्धापन दिन (सप्ताह) सांगता समारोप एचिव्हर्स कॉलेज, कल्याण येथे उत्साहात !!! कल्याण प्र...