प्रभाग क्रमांक ११ मधील रस्त्यांच्या दुरावस्थे बाबत नगरसेविकेचे आयुक्तांना निवेदन..
"लवकरात लवकर संबंधीत रस्ते बनविण्यासाठी 'नमिता पाटील' यांची मागणी"..
टिटवाळा, उमेश जाधव -: प्रभाग क्रमांक ११ मधील रस्त्यांच्या दुरावस्थे बाबत नगरसेविका नमिता पाटील यांनी कडोंमनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे.
बल्याणी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते वैष्णवी माताजी मंदीर व आंबेडकर चौक ते उभंर्णी तसेच आंबेडकर चौक ते शांताबाई नगर मोहिली या डि.पी.मुख्य रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झालेली आहे. या ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडल्याने तेथे अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच दळण-वळण करण्यासाठी वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे. हे सर्व रस्ते मुख्य असल्याने पावसाळ्यात कल्याण-मुरबाड रोड वरील रायते जवळील उल्हास नदिवरील पुला पाण्याखाली गेल्यावर एकमेव हाच रस्ता असून जो टिटवाळा मार्गे शहाड-कल्याण प्रवासा करीता उपलब्ध असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा असते. परंतु वेळो-वेळी या ग्रामीण भागावर महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. मागील पाच-सहा वर्षापासुन अर्थसंकल्पामध्ये हे डि.पी.रोड होण्यासाठी निधीची तरतूद केलेली असुनही, त्यांच्या फाईल्स अद्याप तयार होत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते शांताबाई नगर मोहिली या करीता ४.२८ लक्ष, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते उंभार्णी १.२० लक्ष व बल्याणी मराठी शाळेपासून ते बल्याणी स्मशान भूमी पर्यंत १.२० लक्ष निधी अर्थसंकल्पा मध्ये तरतूद केली आहे. परंतू आता या रस्त्यावर आपल्या महानगर पालिकेकडून खडीकरण केले जात आहे. पाऊसाच्या पुरात सदर खडी ते वाहून जाते. या अडचणीचा विचार करुन शहर अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी प्रभागातील सदर रस्त्यांच्या विकासाची कामांच्या मंजूर रक्कमेचा वापर करण्याचा आदेश करण्यात यावेत, अशी विनंती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नगरसेविका नमिता मयूर पाटील यांनी केली आहे. तसेच या त्रासाबाबत दरोरोज वाढत्या तक्रारीमुळे आम्हाला नागरिकांना तोंड देणे कठीण झाले आहे. आम्ही लोकशाही मार्गने मागणी करत आहोत, आंदोलनाचा मार्ग अंगी करावा लागणार नाही या बाबत आम्ही शाश्वत आहोत. गत ५ वर्ष हा निधी वापरात न आणण्याचे प्रशासनाचे नक्की धोरण काय आहे. सदर धोरणामुळे मला माझ्या प्रभागातील नागरीकांच्या रोशाला कारणीभूत ठरणार नाहीत ना ? या बाबत विचार व्हावा असे देखील त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.


No comments:
Post a Comment