खडवली भातसा नदीवरील पुलाचे रेलिंग व डांबर पुरात गेली वाहून !
टिटवाळा, उमेश जाधव -: बुधवार व गुरूवारी झालेल्या महापूराने कल्याण तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले होते. या पूराचा फटका खडवली भातसा नदी वरील पुला मोठा बसला आहे. यात पुलाची रेलिंग व पुलावरील डांबरीचा थर देखील वाहून गेला आहे.
गेली दोन दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे संपूर्ण कल्याण तालुका झोडपून काढला आहे. यात काळू, भातसा, उल्हास व बारवी या चारही नद्यांना पूरा आला होता.
या पूराचा फटका तालुक्यातील अनेक भागाला बसला. यात खडवली येथील भातसा नदिवरील पूल देखील सुटला नाही. जवळ जवळ हा पुल दहा ते अकरा तास पाण्याखाली होता. या पूरात पुलाच्या रेलिंग (संरक्षीत कडा) पूर्णतः वाहून गेल्या आहेत. तसेच पुलावरील डांबरीचा थर ही वाहून जाऊन या ठिकाणी खड्डे निर्माण झाले होते. सध्या संबंधित प्रशासकीय विभागाकडून डागडुजी करुन तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली आहे. पुरामुळे वाहून आलेली झाडे, टाकावू वस्तू व इतर गोष्टी काही ठिकाणी पुलावर अडकलेल्या आहेत. या पूलावरून खडवली-पडघा या ठिकाणी मोठ्या वाहतूक होत असते. या कारणास्तव सदर रेलिंग लवकरात लवकर बसविण्यात यावी अशी मागणी येथून करण्यात येत आहे.



No comments:
Post a Comment