Tuesday, 9 December 2025

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित !

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित !

मुंबई (शांताराम गुडेकर)

               सेनादल अधिकारी तथा सीबीआय क्राईम ब्रँच कमांडो ज्येष्ठ अधिकाऱ्यांसाठी आयोजित राष्ट्रीय युवा अधिवेशन नुकतेच तेलंगणा राज्याच्या भाग्यनगर शहरात पार पडले. या तीन दिवसिय अधिवेशनात राष्ट्रभरातील २५ व्यक्ती तथा संस्थांचा विशेष उपस्थिती सन्मान सोहळा संपन्न झाला. साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष श्री. मंगेश अंकुश रासम हे गेली ४० वर्ष समाज सेवेत आणि अन्नदान सेवेमध्ये यशस्वीरित्या परिपूर्ण कार्य करीत आहेत. त्यांच्या या कार्याचा यथोचित गौरव म्हणून ज्येष्ठ आण्विक शास्त्रज्ञ तथा अनेक राष्ट्रांचे आण्विक सल्लागार म्हणून कार्यरत श्री घंटी सूर्यनारायण मूर्ती यांच्या द्वारा सदर सन्मान वेद फाउंडेशन अध्यक्ष स्वप्नील वाडेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
             आदिवासी भागातील विवाह सोहळा आयोजन समितीमध्ये कार्यरत असल्यामुळे श्री.मंगेश रासम आदिवासी भागात दिवस रात्र कार्यरत होते त्यांच्या या कार्यामुळे युथ फॉर् नेशन संस्थेच्या विशेष अधिवेशनात उपस्थित असलेले स्वप्नील आणि नंदकुमार यांनी तो श्री.मंगेश यांच्यासाठी स्वीकारला. भारताचे आण्विक शास्त्रज्ञ यांनी श्री मंगेश रासम यांना आम्ही गत अडीच ते तीन वर्षे ओळखत असून त्यांचा कार्य जवळ पाहत आहोत आणि त्यामुळे त्यांना हा सन्मान विविध लष्करी अधिकारी सैन्य अधिकारी यांच्यासमोर प्रदान करण्यात येत आहे तथा त्यांची अनुपस्थिती आम्हाला त्रासदायक असली तरी त्यांचं कार्य सतत पुढे चालूच राहावं ही या सन्मानाची शुभकामना आहे असे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केले भाग्यनगर मध्ये आयोजित सदर सोहळ्यामध्ये दिल्लीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या सर्व शहिदांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली आणि लवकरच सरकार द्वारा होणाऱ्या आतंकवाद विरोधी कारवाईला लष्कराचा पाठिंबा देखील दर्शविण्यात आला

No comments:

Post a Comment

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित !

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित ! मुंबई (शांताराम गुडेकर)                सेनादल अधिकारी तथा सीबीआय ...