प्रभाग क्रमांक ११ मधुन शिवसेने कडुन रूचिता नाईक यांची उमेदवारी निश्चित....
**भाजप मधुन मनोज पाटील राजु ढगे यांची नावे आघाडीवर..
नालासोपारा ता, १० :- एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना सध्या भाजपसोबत राज्यात महायुती म्हणून सत्तेत आहे. हीच महायुती म्हणून ते वसई विरार महापालिका देखील लढवणार आहेत. नालासोपारा पश्चिम मधील :'प्रभाग क्रमांक ११' मधिल सर्वसाधारण महिला जागेवर शिवसेना ठाम असल्याने हि जागा "शिवसेनेच्या रूचिता नाईक" यांचे नाव आघाडीवर असल्याने त्यांना हि जागा मिळण्याचे निश्चित झाले आहे.
तर खुला पुरूष आरक्षित जागेवर भाजप कडुन मनोज पाटील यांचे नाव तर ओबीसी आरक्षित जागेवर मा. नगरसेवक राजू ढगे यांना हि जागा देण्यात येणार असल्याचे निश्चित झाल्याचे विश्वसनीय सुत्रांची माहिती आहे. एससी आरक्षित जागेसाठी कोणाचे नाव पुढे येणार हे अजुन गुलदस्त्यात आहे.
इथल्या प्रभागांवरुन आता महायुतीतील या दोन पक्षांमध्ये चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. नवीन प्रभाग रचनेनुसार समेळ पाडा उमराळे करमाळा साईनगर श्रीप्रस्था म्हाडा निळेमोरे असा भला मोठा प्रभाग असल्याने यामधे 42 हजार मतदारांची संख्या आहे.
प्रभाग क्रमांक ११ मधुन महायुतीचे उमेदवारी यांना मिळण्याचे निश्चित होणार आहेत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. या निवडणुकीत कडे सर्वांचे लक्ष लागले असून महापालिकेवर कोणाची पकड़ राहते ही बघणाऱ्या सारखे आहे.
No comments:
Post a Comment