Sunday, 1 August 2021

भाजपा परिवार तर्फे घाटकोपर मध्ये मोफत लसीकरण शिबिर संपन्न !

भाजपा परिवार तर्फे घाटकोपर मध्ये मोफत लसीकरण शिबिर संपन्न !


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :

          कोरोना महामारीच्या विरुद्ध लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण करणारी कोरोनाची लस देण्याचा उपक्रम सर्वत्र राबविण्यात येत आहे देशासह राज्यभरात कोरोना मुक्तीसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात जात आहेत मुंबई मध्ये अनेक सामाजिक संस्था ही पुढाकार घेऊन विविध ठिकाणी लसीकरण शिबीर कार्यक्रम आयोजित करीत आहेत माजी मंत्री प्रकाश मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा परिवार तर्फे घाटकोपर पूर्वच्या गरजू लोकांना एक दिवसीय मोफत लसीकरण शिबिर आज रविवार दिनांक १ ऑगस्ट रोजी संपन्न झाले. या एक दिवसीय शिबिरात प्रभाग निहाय लोकांची नोंदणी करून मोफत लस देण्यात आली या लसीकरण शिबिरासाठी विभागातील प्रतिष्ठित व्यक्तींनी सहकार्य केले. या शिबिराचे उदघाटन खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते व माजी मंत्री प्रकाश महेता यांच्या उपस्थितीत करण्यात आले. घाटकोपर पूर्व भाजपा परिवार च्या मोफत लसीकरण शिबिराला विभागातील गरजू लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून लोकांची लस ची मागणी पाहता या पुढे ही टप्पा टप्याने मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रकाश महेता यांनी सांगितले. यावेळी हर्ष महेंता, जिल्हा अध्यक्ष अशोक राय, विनायक कामत, रमेश मोरबिया, रमेश पारीख, कीर्ती शहा, शैलेश जोशी, नितीन मणियार, भावेश भानुशाली, बाळा गोलतकर, चेतन पुरंदरें, गजानन पवार, पियुष दास, भरत सोनी, दत्ता निकम, निलेश दोशी, मित्तल महेता, सचिन मानकर, किसन थोरात, युवराज खैरनार, संदीप त्रिपाठी आदीसह माजी नगरसेविका शोभा आसर, सीताताई बागवे आदींनी शिबिर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. या शिबिरात ५०० लोकांनी लसीकरणाचा लाभ घेतला असून हिंदुसभा रुग्णालयातील डॉक्टरांच्या सहकार्यातून शिबिर यशस्वी झाले.

No comments:

Post a Comment

जॉय सामाजिक संस्था मुंबई (रजि.) तर्फे कोकण सुपुत्र शांताराम गुडेकर यांची "आदर्श पत्रकार पुरस्कार -२०२५" साठी निवड !!

जॉय सामाजिक संस्था मुंबई (रजि.) तर्फे कोकण सुपुत्र शांताराम गुडेकर यांची "आदर्श पत्रकार पुरस्कार -२०२५" साठी निवड !! म...