Sunday, 1 August 2021

लांजा तालुक्यातील होमगार्डना नवीमुंबई माजी उपमहापौर अविनाश दादा लाड यांच्याकडून रेनकोट वाटप !

लांजा तालुक्यातील होमगार्डना नवीमुंबई माजी उपमहापौर अविनाश दादा लाड यांच्याकडून रेनकोट वाटप !


मुंबई, (शांत्ताराम  गुडेकर) :
        नवी मुंबईचे माजी उपमहापौर आणि काँग्रेस नेते अविनाश दादा लाड यांच्याकडून लांजा तालुक्यातील होमगार्ड यांना साखरपा येथे रेनकोट वाटप करण्यात आले. पोलीसांप्रमाणेच जनतेच्या सुरक्षेसाठी होमगार्ड डोळ्यात तेल घालून आपली भुमिका बजावत असतात. ऊन असो किंवा पाऊस असो याची तमा न बाळगता कडा पहारा करीत असतात. आज लांजा तालुक्यातील जनतेची सुरक्षेची जबाबदारी या होमगार्डना आज अविनाश दादा लाड यांनी रेनकोट प्रदान करीत त्यांचे मनाेबल वाढविले. यावेळी नेरुळचे शाखाप्रमुख सुधाकर सावंत, मंगेश (भाऊ) बाईंग, रत्नागिरी युवा काँग्रेसचे सरचिटणी अरविंद तावडे, देविदास निरकुटे, उपसरपंच संकेत माईल, योगेश बांडागले आदींसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...