Sunday, 1 August 2021

काॅंग्रेसनेते व नवीमुंबईचे माजी उपमहापौर अविनाशदादा लाड यांनी आज चिपळुण येथील पुरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात पुढे केला ! "आपले कर्तव्य समजून प्रत्यक्ष अन्नधान्य किट व जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप"

काॅंग्रेसनेते व नवीमुंबईचे माजी उपमहापौर अविनाशदादा लाड यांनी आज चिपळुण येथील पुरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात पुढे केला !

"आपले कर्तव्य समजून प्रत्यक्ष अन्नधान्य किट व जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप"


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :

        कॉंग्रेसचे नेते व नवी मुंबई मा. उपमहापौर तसेच विद्यमान नगरसेवक मा. श्री. अविनाश लाड यांच्यावतीने चिपळूण मधील गोवळकोट येथिल पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूं व अन्नधान्याचे किट देत मदतीचा हात पुढे करीत आहेत. लांजा-राजापुर-साखरपा सारख्या नागरिकांना मदत करता करता आज थेट मदत घेवून चिपळुण येथील नागरिकांची भेट घेतली आहे. त्यांच्या या कार्याला कोकणवाशियांकडून सलाम करण्यात येत आहे. कोकणातील चिपळूण शहरात आलेल्या महापुराने अनेकांचे संसार उधवस्त झाले आहेत. येथील परिस्थिती विदारक आहे. अनेक कुटूंबाना सावरण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत. अश्या कुटूंबाना आपले कर्तव्य समजून “एक हात मदतीचा” म्हणून ‘कॉग्रेस नेते व नवी मुंबई मा. उपमहापौर विद्यमान नगरसेवक मा.श्री.अविनाश लाड साहेब यांच्या मार्फत जीवनावश्यक वस्तूचे किटस् चिपळूण पूरग्रस्तांना वाटप करण्यात आले. यावेळी चिपळूण मधील निर्वाळा गावचे सरपंच श्री.मधुकर सावंत, जिल्हा काँग्रेस सचिव .श्री. संतोष गोताड. लांजा कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शांताराम गाडे, अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे, महम्मद पावसकर , बाळकृष्ण (ब्बया) हेगिष्टे, किरण दाभोलकर दाभोळे उपसरपंच, संतोष बांडागळे कनकाडी उपसरपंच, सुदेश चव्हाण, बंडुदादा जाधव, सौरभ कामेरकर, लक्ष्मण पितळे, कॉंग्रेसचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

वाढत्या रिक्षाच्या संख्येमुळे रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ !!

वाढत्या रिक्षांमुळे उत्पन्नात घट ; रिक्षा चालकांचे घटत आहे उत्पन्न.... ***वाढत्या रिक्षाच्या संख्येमुळे रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ. ...