स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाने केला कोरोना योद्ध्यांचा सन्मान !!
मुरबाड, (मंगल डोंगरे) : अवघ्या दोन दिवसांवर भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 75 वा वर्धापन दिन येऊन ठेपला असताना, स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येला मुरबाड शहरातील राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाने गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारी संकटात काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्याचे ठरवले आणि आज बरोबर 75 व्यक्तींना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगभर थैमान घातलेल्या कोरोनाने भारतात देखील लाखो लोक म्रुत्यु मुखी पडले, अशावेळी निरापराध नागरिकांचे जिव वाचवण्यासाठी त्या त्या ठिकाणी डॉक्टर, नर्स, मेडिकल फिल्ड, अँम्ब्युलन्स ड्रायव्हर, पोलीस, पत्रकार, नगरपंचायतचे सफाई कर्मचारी, अधिकारी, आणि अनेक समाजसेवी संघटनांचे कार्यकर्ते, यांनी आपल्या जिवाची बाजी लावत मदतीचा हात देत अनेकांचे प्राण वाचविले. कुठे अन्न दान, कुठे प्रवासात अडकलेल्याना मदत केली. मानवसेवा हि केवळ ईश्वर सेवा नसुन देशसेवा हे ब्रिद डोळ्यासमोर ठेवून हे कार्य केले. पत्रकार आणि पोलीस प्रशासनाने जनतेला वर्तमान परिस्थिती आणि सुरक्षेसाठी सहकार्य केले. अशा योद्यांच्या पाठीवर कुठेतरी कौतुकाची थाप मारावी म्हणून मुरबाड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष विलास जाधव यांनी आजच्या या कार्यक्रमाचे क्रुषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आयोजन केले होते.
यावेळी तालुक्यातील डॉक्टर, नर्स, अँम्ब्युलन्स ड्रायव्हर, नगरपंचायत चे सफाई कर्मचारी,अधिकारी, पोलीस, पत्रकार, आणि विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना ** कोरोना योद्धा** पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुरबाड पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराडे साहेब, राष्ट्रवादीचे युवा नेते सौरव प्रमोद हिंदुराव, ठाणे जि.उपाध्यक्ष हरेश पुरोहित, जेष्ठ कार्यकर्ते संतोष खाटेघरे, दिलीप शेळके, अविनाश भोईर, न्याय विभागाचे अध्यक्ष नामदेव गायकवाड, विजय घायवट, युवाचे अध्यक्ष बाळू भोईर, रवींद्र केंबारी, शहर अध्यक्ष -दिपक वाघचौडे, विलास भावार्थे,आनंद घाडगे, आशिष तेलवणे, शिवाजी नवले यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment